घरात पाणी शिरले आणि मागोमाग मृत्यूनेही गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:06 IST2021-07-20T04:06:28+5:302021-07-20T04:06:28+5:30

कांदिवलीत तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेले दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कांदिवलीत राहणाऱ्या रितेश ...

Water seeped into the house and death followed | घरात पाणी शिरले आणि मागोमाग मृत्यूनेही गाठले

घरात पाणी शिरले आणि मागोमाग मृत्यूनेही गाठले

कांदिवलीत तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेले दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कांदिवलीत राहणाऱ्या रितेश झा (वय २१) याच्या घरात सोमवारी पाणी शिरले. त्यातून वाचण्यासाठी तो घराबाहेर पडला, पण तिथेच त्याला मृत्यूने गाठले.

कांदिवलीतील पोईसर परिसराता राहणाऱ्या झा याच्या घरात शिरलेले पाणी अगदी खांद्यापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे हा तरुण कसाबसा बाहेर पडला आणि तोल जाऊ नये म्हणून जवळच्या शटरचा आधार घेतला. त्या तरुणाच्या दुर्दैवाने त्याने हात लावलेल्या शटरमध्ये वीज प्रवाह उतरलेला असल्याने त्याला जोराचा झटका बसून तो जागीच बेशुद्ध झाला. स्थानिकांनी लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, इतर दोन जखमींवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Water seeped into the house and death followed