पालिकेची जलवाहिनी फुटली
By Admin | Updated: December 8, 2014 23:51 IST2014-12-08T23:51:13+5:302014-12-08T23:51:13+5:30
गेल्या आठवडय़ात एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी आरटीओ कार्यालयाजवळ ठाणो महापालिकेची जलवाहिनी दुपारी फुटली.

पालिकेची जलवाहिनी फुटली
ठाणो : गेल्या आठवडय़ात एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी आरटीओ कार्यालयाजवळ ठाणो महापालिकेची जलवाहिनी दुपारी फुटली. या जलवाहिनीचा वॉल तुटल्यामुळे यामधून प्रचंड वेगाने पाणी बाहेर आल्याने सर्व रस्ता जलमय झाला.
सव्र्हिस रोड परिसरात 6क्क् एमएमची ही जलवाहिनी असून यामधून मेंटल हॉस्पिटल, इटर्निटी मॉल, रघुनाथनगर, एलबीएस रोड, भास्कर कॉलनी, नौपाडा अशा परिसरांना पाणीपुरवठा केला जातो. दुपारी 3 ला या जलवाहिनीजवळून मागे वळण घेताना एका ट्रकचा धक्का जलवाहिनीच्या वॉलला लागल्याने तो तुटला आणि वेगाने पाण्याच्या लाटा बाहेर आल्या. पाण्याचा वेग एवढा अधिक होता की, तिस:या मजल्यार्पयत पाण्याचे फवारे उडत होते. काही वेळाने पाणीपुरवठादेखील सुरळीत झाला. (प्रतिनिधी)