कर्नाळा अभयारण्यात पाणी ‘मुरणार’

By Admin | Updated: December 21, 2014 23:19 IST2014-12-21T23:19:14+5:302014-12-21T23:19:14+5:30

मुंबई - गोवा कर्नाळा पक्षी अभयारण्यात उन्हाळ्याच्या दिवसात तलाव आणि बंधाऱ्यांचा घसा कोरडा पडतो. जलाशयातील पाणी आटल्याने येथील पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.

Water in the Karnala Wildlife Sanctuary | कर्नाळा अभयारण्यात पाणी ‘मुरणार’

कर्नाळा अभयारण्यात पाणी ‘मुरणार’

पनवेल : मुंबई - गोवा कर्नाळा पक्षी अभयारण्यात उन्हाळ्याच्या दिवसात तलाव आणि बंधाऱ्यांचा घसा कोरडा पडतो. जलाशयातील पाणी आटल्याने येथील पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. याकरिता अभयारण्य प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम येथे राबवून नव्याने बंधारेही बांधण्यात येणार आहेत.
पनवेल शहरापासून १२ किमी अंतरावर अतिशय सुंदर, रमणीय व विविध प्रकारच्या वृक्षवेलींनी व पक्ष्यांनी समृध्द असे कर्नाळा अभयारण्य आहे. मुंबईपासून काही तासाच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. लोणावळ्याप्रमाणे कर्नाळा उंचावर असल्याने येथील हवाही नेहमी थंड असते. निसर्ग, हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत. या शिवाय १३४ प्रजातीचे स्थानिक तर ३८ प्रजातीचे स्थलांतरीय पक्षीही आढळतात.
कडक उन्हामुळे या पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अभयारण्य परिसरात पक्ष्यांसाठी तीन तलाव खोदण्यात आले असले तरी अगदी एप्रिल महिन्याच्या मध्यंतरातच हे तलाव कोरडे ठणठणीत होतात. त्यामुळे अभयारण्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. दरम्यान संपूर्ण अभयारण्यात पाण्यासाठी एकच बोअरवेल असून पाइपलाइनच्या माध्यमातून विश्रामगृहापर्यंत पाणी नेले जात आहे. परंतु कडक उन्हाळ्यात हे पाणी पुरेशे पडत नाही. (वार्ताहर)

Web Title: Water in the Karnala Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.