गोराईकरांचा पाणी प्रश्न सुटणार?

By Admin | Updated: May 20, 2015 00:40 IST2015-05-20T00:40:33+5:302015-05-20T00:40:33+5:30

मालाडच्या मनोरी परिसरातील अनधिकृत नळजोडण्यांमुळे गोराईकरांना गेल्या कित्येक वर्षांपासून पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

The water of Goraikar water questioned? | गोराईकरांचा पाणी प्रश्न सुटणार?

गोराईकरांचा पाणी प्रश्न सुटणार?

मुंबई : मालाडच्या मनोरी परिसरातील अनधिकृत नळजोडण्यांमुळे गोराईकरांना गेल्या कित्येक वर्षांपासून पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याच्या विरोधात गोराईकरांनी एक भव्य मोर्चा काढल्यानंतर पालिकेच्या पी उत्तर विभागाने येथील २६ अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यात आल्या. ही कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र ही कारवाई केल्यानंतरही गोराईकरांच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटलेला नाही.
मनोरी विभागात असलेल्या लॉज आणि हॉटेल्स्ना अनधिकृतपणे नळ जोडण्या दिल्यामुळे गोराईकरांना पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. याच्याच विरोधात गेल्या महिन्यात गोराईकरांनी पालिकेच्या आर मध्य विभागावर धडक मोर्चा नेला होता. ज्यात जवळपास हजारो रहिवाशी सामिल झाले होते. पाण्याची बिले वेळच्या वेळी येतात, मात्र पाणीच तेवढे येत नाही असा प्रश्न स्थानिकांनी पालिका प्रशासनाला केला होता. मनोरीतील अनधिकृत पाणी पुरवठ्यामुळे हा त्रास आम्हाला भोगावा लागत असल्याचेही रहिवाश्यांनी सांगितले होते. त्यावेळी मनोरीतील अनधिकृत नळ जोडण्यांवर करावी केली जाईल, तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे आश्वासन आर मध्यच्या सहाय्यक आयुक्तांनी दिले होते. ‘काही दिवसांपूर्वी पाणी प्रश्नावर आमची एक बैठक झाली. ज्यात पी उत्तर विभागाकडून अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यात आली’, असे आर मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
याबाबत पालिकेच्या पी उत्तर विभागाशी संपर्क केला असता ‘आम्ही गेल्या आठवड्यात मनोरी विभागातील २६ नळ जोडण्या तोडल्या’, अशी माहिती येथील संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. मात्र असंख्य अनधिकृत नळ जोडण्यांच्या बदल्यात अवघ्या २६ नळ जोडण्यावरील कारवाईमुळे गोराईकरांच्या पाणीसमस्येचे समाधान झालेले नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष आहे .

पाणीचोरांविरोधात गुन्हा दाखल करा
मनोरी हे मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोडत असल्याने, याठिकाणी पत्र दिल्याचा दावा पी उत्तर विभागाकडून केला गेला आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कोणाच्याही विरोधात तक्रार केली गेलेली नाही. त्यामुळे तुरळक कारवाईनंतर अवघ्या काही तासात या नळजोडण्या पुन्हा जोडल्या जातात. परिणामी इथली परिस्थिती ह्यजैसे थेह्ण अशी होते. त्यामुळे या कारवाईनंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, जेणेकरून या पाणी चोरांवर वाचक बसेल, अशी मागणी गोराईकरांकडून केली जात आहे.

Web Title: The water of Goraikar water questioned?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.