Join us  

पोलीस ठाण्यांची झाली तळी; पोलिसांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 4:52 AM

मुंबईतील सायन, माटुंगा, कस्तुरबा मार्ग , वाकोला आणि साकी नाका पोलीस ठाण्यात पावसाच्या पाण्यामुळे पोलीस ठाण्यांची तळी झाली होती.

मुंबई  : गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा सोमवारी रात्री जोर वाढला आणि बहुतांश मुंबईची तुंबई झाली. शाळा, दुकानं, घरं आणि कार्यालयांत पाणी शिरले. इतकेत नव्हे तर मुंबईकरांच्या समस्या आणि सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस ठाण्यांत पाणीच पाणी साचले होते. अशा परिस्थितीत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपले कर्तव्य बजावत होते. नागरिकांच्या सेवेसाठी गुडघ्याभर पाण्यातही पोलीस सज्ज होते.

मुंबईतील सायन, माटुंगा, कस्तुरबा मार्ग , वाकोला आणि साकी नाका पोलीस ठाण्यात पावसाच्या पाण्यामुळे पोलीस ठाण्यांची तळी झाली होती. तसेच, आज सकाळी खेरवाडी पोलीस ठाणे हद्दीत पावसामुळे पाणी साचले होते. सर्व हॉटेल, चहा टपऱ्या बंद होत्या व रात्रपाळी कर्तव्य करुन उशिरापर्यंत बंदोबस्तावर हजर राहून देखील महिला पोलिसांनी चहा नाश्ता देऊन खाकितील अनोखी माणुसकी दाखवली.

खेरवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या आणि खेरवाडी येथे राहत असलेल्या महिला पोलीस शिपाई माया दिघे व महिला पोलीस शिपाई अश्विनी विभुते यांनी पोलीस बांधवांना स्वत:च्या घरून चहा नाष्टा देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.

टॅग्स :मुंबईपोलिस