पाण्यासाठी वणवण

By Admin | Updated: April 25, 2015 22:23 IST2015-04-25T22:23:51+5:302015-04-25T22:23:51+5:30

तालुक्यात भीषण पाणी टंचाई असून नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. अनेकवेळा गावात येणाऱ्या टँकरची वाट बघताना मजुरीही सोडावी लागते.

Water distribution | पाण्यासाठी वणवण

पाण्यासाठी वणवण

मोखाडा : तालुक्यात भीषण पाणी टंचाई असून नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. अनेकवेळा गावात येणाऱ्या टँकरची वाट बघताना मजुरीही सोडावी लागते. दरवर्षी उद्भवणाऱ्या या पस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यास प्रशासनाला अद्यापही यश आले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनातर्फे तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी तात्पुरत्या स्वरुपात बंदोबस्त करण्यात येतो. यासाठी लाखो रुपये खर्च केले जाते. मात्र नागरिकांना पाहिजे तसा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.
तालुक्यात २५ ते २६ कि.मी. अंतरावरही गाव-पाडे विखुरलेले आहेत. डोंगर कपाऱ्यात वसलेल्या गाव-पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी दूरवरचे अंतर असल्याने वेळही जातो. टँकरची तास्नतास वाट बघावी लागते.
यामुळे मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या आदिवासी बांधवाना मोठी अडचण निर्माण झाली आहे. (वार्ताहर)

विक्रमगड तालुक्यातील आदिवासी गाव-पाड्यांना टँकरमुक्त पाणीपुरवठा व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले गेले. मात्र टँकरमुक्त गावांची संख्या मात्र कमी झाली नाही. काही योजना अर्धवट स्थितीत पडून आहेत. दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने ‘खायला नको पण पाणी पाजा’ अशी अवस्था नागरिकांची आहे.
तालुक्यात साखरे, केव, खुदेड, वेहलपाडा या ग्रामपंचायत हद्दीतील पाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
अनेक पाणीपुरवठा योजना बंद आहे. तर ४ ते ५ योजनेचे काम तीनवर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना नदी-नाल्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

प्रशासनाची धावपळ
दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन केले जाते. मात्र योग्यवेळी नागरिकांना पाणीच मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ऐन वेळेवर धावपळ करण्याची प्रशासनाची सवय नित्याचीच झाली आहे.
हंडाभर पाण्यासाठी...
नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. टँकरची तास्नतास वाट बघितल्यानंतर केवळ हंडाभर पाणी मिळते. त्यामुळे मजुरीवरही याचा परिणाम पडत आहे.

 

Web Title: Water distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.