वर्तकनगरात 300 घरांत पाणी

By Admin | Updated: August 19, 2014 02:21 IST2014-08-19T02:21:18+5:302014-08-19T02:21:18+5:30

सर्वत्र दहीहंडीची धूम सुरु असताना ठाण्यातील वर्तकनगर, भीमनगर परिसरातून जाणारी मुंबई महापालिकेची पाइपलाइन सोमवारी सकाळी फुटली. 1

The water of 300 houses in the Vartakarnagar | वर्तकनगरात 300 घरांत पाणी

वर्तकनगरात 300 घरांत पाणी

ठाणो : सर्वत्र दहीहंडीची धूम सुरु  असताना ठाण्यातील वर्तकनगर, भीमनगर परिसरातून जाणारी मुंबई महापालिकेची  पाइपलाइन सोमवारी सकाळी फुटली. 1200 मिमी व्यासाची पाइपलाइन फुटल्याने या परिसरात प्रचंड दाबाने पाण्याचा विसर्ग झाला. यात लाखो लीटर पाणी वाया गेले असून पाइपलाइन परिसरातील सुमारे 25क् ते 3क्क् घरांत पाणी शिरले. पाण्याच्या लोटाने रहिवाशांची तारांबळ उडाली. पाण्याचा वेग  इतका होता की, यातून वाहून जाऊ नये म्हणून रहिवाशांना घरांच्या भिंतींना धरून राहावे लागले. दरम्यान, यामुळे मुंबईत 25 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. 
तानसा धरणातून मुंबईकरांना पाणी वाहून नेणारी 12क्क् मिमी व्यासाची पाइपलाइन वर्तकनगर, भीमनगर भागांतून जाते. ही  पाइपलाइन सकाळी 1क् वाजण्याच्या सुमारास फुटली. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील झोपडपट्टीत गुडघाभर पाणी शिरले आणि येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली. यात काही घरांचे नुकसान झाले आहे. विजय देवर हा 7 वर्षीय मुलगा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणो महापालिका अगिAशमन दल आणि आपत्कालीन पथक विभागाने या ठिकाणी धाव घेतली.
यात जखमी झालेल्या विजयला खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली. या घटनेच्या प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यात या ठिकाणी 3 घरांचे नुकसान झाले असून दोघे जखमी झाले. 
एकूण 65 लाख 4क् हजारांची वित्तहानी झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुंबई महापालिकेच्या पाइपलाइन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  (प्रतिनिधी)
 

 

Web Title: The water of 300 houses in the Vartakarnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.