रेशनिंग गोदामावर कॅमे-यांची नजर

By Admin | Updated: August 26, 2014 01:21 IST2014-08-26T01:21:01+5:302014-08-26T01:21:01+5:30

रेशनिंगचा माल साठवणूक करण्यासाठी पुरवठा विभागाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोदामात सीसी कॅमेरे बसविण्यात निर्णय घेण्यात आला आहे.

Watch the rationing godown on camera | रेशनिंग गोदामावर कॅमे-यांची नजर

रेशनिंग गोदामावर कॅमे-यांची नजर

प्रशांत शेडगे, पनवेल
रेशनिंगचा माल साठवणूक करण्यासाठी पुरवठा विभागाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोदामात सीसी कॅमेरे बसविण्यात निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच ही सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे रेशनिंग धान्य वितरीत करण्यासाठी पारदर्शकता येईलच. त्याचबरोबर गैरप्रकारही कमी होतील असा विश्वास पुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पनवेल तालुका विस्ताराने मोठा असून शिधापत्रिकांच्या संख्येत भर पडली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शिधापत्रिके वर स्वस्त धान्य दिले जाते. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरिबांना अत्यल्प दराने धान्य दिले जाते. परिणामी प्रत्येक महिन्याला पनवेलला ११०० मेट्रिक टनाच्या आसपास शासकीय धान्य येते. त्यामध्ये गहू, साखर, तांदूळ आणि साखरेचा समावेश झाला. तालुक्यात ७७ हजार रेशनकार्डवर धान्य वितरीत केले जात असून त्याचा लाखो लाभार्थ्यांनी लाभ घेतला होता. शासनाकडून येणारे धान्य हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी साठवून ठेवले जाते आणि तेथून गावोगावी असलेल्या स्वस्त धान्याच्या दुकानात हे धान्य पाठवले जाते.
पनवेल मार्केट यार्ड परिसरात १९६६ साली प्रत्येकी ५०० मेट्रिक टन क्षमतेची तीन गोदामे बांधण्यात आली. मात्र त्याची व्यवस्थित देखभाल न केल्याने किंवा वेळोवेळी डागडुजी झाली नसल्याने त्याची दुरवस्था झाली. त्याचबरोबर आजूबाजूला मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्याकरिता बांधकाम व्यावसायिकांनी भराव केला. त्यामुळे शासकीय गोदाम त्याच जागेवर राहिल्याने इमारतींचे पाणी शिरून धान्य भिजण्याचे प्रकार घडले आहेत. काही महिन्यांपूर्वी धान्य ठेवत असलेल्या गोदामाची भिंत कोसळली होती. या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करून ही इमारती धोकादायक असल्याने सांगत वापरास अयोग्य असल्याचे पुरवठा विभागाला कळविले. त्यामुळे या विभागाने काही महिन्यापूर्वी सीसीआयचे गोदाम भाड्याने घेवून धान्य त्या ठिकाणी हलविले आहे. या ठिकाणी धान्य उतरविण्यात येत असून तेथून दुकानदारांना वितरीत करण्यात येते. भाडेतत्त्वावर घेण्यात आलेले हे गोदाम कळंबोली येथे असल्याने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी अडचणी येतात. या सर्व गोष्टींचा विचार करून तालुका पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांनी गोदामात सीसी कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तहसीलदार पवन चांडक यांच्याकडे मांडला. तहसीलदार चांडक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Web Title: Watch the rationing godown on camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.