मुंबईत तिवरांवर कचऱ्याचे संकट, ८ हजार टन कचरा गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 02:00 IST2018-08-09T02:00:16+5:302018-08-09T02:00:27+5:30
मुंबईच्या समुद्रासह खाडी क्षेत्रातील तिवरांची कत्तल दिवसागणिक वाढतच असून, येथील तिवरांचे संरक्षण कसे करायचे, असा यक्षप्रश्न कांदळवन विभागासमोर उभा आहे.

मुंबईत तिवरांवर कचऱ्याचे संकट, ८ हजार टन कचरा गोळा
- सचिन लुंगसे
मुंबई : मुंबईच्या समुद्रासह खाडी क्षेत्रातील तिवरांची कत्तल दिवसागणिक वाढतच असून, येथील तिवरांचे संरक्षण कसे करायचे, असा यक्षप्रश्न कांदळवन विभागासमोर उभा आहे. असे असतानाच जानेवारी ते जून २०१८ या कालावधीदरम्यान मुंबई आणि नवी मुंबई येथील तिवरांच्या प्रदेशातून तब्बल ८ हजार टन कचरा गोळा करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे येथील कचरा गोळा करतानाच ३०० हेक्टरवर वृक्षांची लागवडही करण्यात आल्याचा दावा कांदळवन विभागाने केला आहे. प्रत्यक्षात हा दावा खोटा असल्याचे वॉचडॉगचे म्हणणे असून समुद्र, कांदळवन येथे कचरा वाहून जाऊ नये म्हणून प्रशासनाने जाळीचा वापर करीत हा कचरा अडवावा. जेणेकरून कांदळवन आणि समुद्र, खाडीत प्लॅस्टिकसह तत्सम कचरा जमा होणार नाही, असे वॉचडॉगने म्हटले आहे.
खारफुटीच्या जंगलांचे आच्छादन १९८० ते २००५ या काळात २० टक्के कमी झाले आहे. जंगले ज्या वेगाने नष्ट होत आहेत, त्याच्या ३ ते ५ पट जास्त वेगाने खारफुटीची जंगले नष्ट होत आहेत. खारफुटीचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणांवर आहे. मात्र अंमलबजावणीअभावी खारफुटीच्या संरक्षणाला मर्यादा आहेत. खाडीकिनाºयावर मातीचा भराव टाकून शहरे वसवली जात आहेत. परिणामी, खारफुटींचा ºहास होत आहे. खारफुटींची कत्तल करून बेकायदा बांधकामे केली जात आहेत. अनेक ठिकाणी भराव टाकून खारफुटी नष्ट केली जात आहे.
केंद्र सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या वन सर्वेक्षणात, मुंबईतील तिवरांच्या क्षेत्रात १६ चौरस किमीची वाढ झाल्याचा दावा केला होता. मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे ४ हजार हेक्टर जमिनीवर खारफुटीचे जंगल आहे. त्यापैकी २७७ हेक्टर हे मुंबई शहरात आणि ३ हजार ७२३ हेक्टर हे उपनगरात आहे. बोरीवली परिक्षेत्रात १ हजार ३६५ हेक्टर, कुर्ला येथे २ हजार २८८ हेक्टर आणि अंधेरी परिक्षेत्रात ७० हेक्टरवर खारफुटीचे अस्तित्व आहे. प्रत्यक्षात ही वस्तुस्थिती नाही, असे े‘वॉचडॉग फाउंडेशन’ने म्हटले होते.
>माहिती अधिक़ारात उघड
वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी याच पार्श्वभूमीवर याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी कांदळवन विभागाकडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला. पिमेंटा यांच्या अर्जावर कांदळवन विभागाने तिवर परिसरात राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती देतानाच येथे काय कार्यवाही केली? याचाही तपशील उपलब्ध करून दिला.पिमेंटा यांना माहिती अधिकारान्वये प्राप्त माहितीनुसार, ग्रीन आर्मी, स्वयंसेवक, सामाजिक सेवाभावी संघटना आणि रहिवासी संघटना यांच्या मदतीने जानेवारी २०१८ ते जून २०१८ या कालावधीदरम्यान राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत तिवर परिसरांची स्वच्छता करण्यात आली. या अंतर्गत आठ ठिकाणांवरून तब्बल ८ हजार टन कचरा उचलण्यात आला. मुंबई आणि नवी मुंबई येथील ५ हजार ४७१ हेक्टर क्षेत्रफळ राखीव वने म्हणून घोषित असून, २०१३ ते २०१८ या कालावधीदरम्यान तिवर परिसरातील ३५२.३१ हेक्टर क्षेत्रफळावर वृक्ष लागवड करण्यात आली
आहे, अशी माहिती दिली. प्रत्यक्षात वस्तुस्थिती ही नाही, असे वॉचडॉगचे म्हणणे आहे.सागरी लाटांची तीव्रता कमी करण्याकरिता कांदळवनांची मदत होते, लाटा, वारे यापासून किनारी धूप कमी करण्याकरिता तिवरे मोलाची मदत करतात.
समुद्रात मिसळणारी प्रदूषके गाळून पाण्याची गुणवत्ता सुधारण्याचे काम तिवर करते,वांद्रे, वर्सोवा, दहिसर, शिवडी, वाशी, ऐरोली, भांडुप, गोराई येथे कचरा जमा होतो.
समुद्रातील आणि नदीतील कचरा तिवरांमध्ये साचतो, कचºयात जास्त प्रमाण प्लॅस्टिकचे आहे.
पश्चिम बंगाल, गुजरात, अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा, केरळ, कर्नाटक या ठिकाणी खारफुटीची वने आढळतात.तिवरांच्या जंगलात वाढ नाही, तर घट झाली आहे. हे म्हणणे मांडताना वॉचडॉगने ‘सॅटेलाइट इमेज’चा आधार घेतला.सॅटेलाइटद्वारे २०१५ साली मुंबई शहर, उपनगरातील तिवर क्षेत्रांचे काढण्यात आलेले छायाचित्र आणि २०१८ साली काढण्यात आलेले छायाचित्र या दोघांची तुलना त्यांनी केली.गोराई, मार्वे, आयएनएच हमला, वर्सोवा येथील छायाचित्रांचा समावेश असून, यामध्ये कोठेही तिवरांच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत नाही.