वडवली फाटा ते म्हसळा रस्त्याची दैना

By Admin | Updated: January 15, 2015 22:47 IST2015-01-15T22:47:48+5:302015-01-15T22:47:48+5:30

वडवली फाटा ते म्हसळा मुख्य रस्त्यावरील खानलोशी गावापासून १ किमी व मेंदडी गावाजवळील २ किमी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे

The warehouse from Vadli to Mhasla road | वडवली फाटा ते म्हसळा रस्त्याची दैना

वडवली फाटा ते म्हसळा रस्त्याची दैना

बोर्ली-पंचतन : वडवली फाटा ते म्हसळा मुख्य रस्त्यावरील खानलोशी गावापासून १ किमी व मेंदडी गावाजवळील २ किमी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. सध्या हा रस्ता भल्या मोठ्या खड्ड्यांनी सजला आहे. पावसाळ्यानंतर अद्याप या रस्ता दुरुस्तीकडे बांधकाम खाते का दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
बोर्ली पंचतनहून वडवली फाटा मार्गे म्हसळा हा मुख्य रस्ता येथील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मुंबई पुणे किंवा अन्य ठिकाणी म्हसळा, माणगावकडे जाण्या - येण्यासाठी याच रस्त्यावरून वाहनांची सतत वर्दळ असते. शिवाय दिवेआगर पर्यटनस्थळाकडे येण्यासाठीदेखील हाच महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळही असते. दिघी पोर्टवरून मालाची ने - आण करण्यासाठी याच मार्गाचा उपयोग होतो. परंतु सध्या काही दिवसासाठी दिघी पोर्टची वाहतूक मागील महिनाभर बंद आहे. या रस्त्याची पावसाळ्यानंतर कानलोशी स्टॉपच्या पुढे सुमारे १ किमी व नंतर मेंदडी-वारळ फाटा ते पुढे २ किमी अशी दयनीय अवस्था झाली आहे.

Web Title: The warehouse from Vadli to Mhasla road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.