गोदाम चार महिन्यांपासून अंधारात

By Admin | Updated: May 22, 2014 04:19 IST2014-05-22T04:19:10+5:302014-05-22T04:19:10+5:30

शहापूरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये दारिद्र्यरेषेखाली जगणार्‍या कुटुंबांना शासनाकडून सवलतीच्या दराने धान्य दिले जाते.

Warehouse for four months in the dark | गोदाम चार महिन्यांपासून अंधारात

गोदाम चार महिन्यांपासून अंधारात

भातसानगर : शहापूरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये दारिद्र्यरेषेखाली जगणार्‍या कुटुंबांना शासनाकडून सवलतीच्या दराने धान्य दिले जाते. मात्र हाच धान्यसाठा निम्म्याने कमी झाल्याने तो गरीब कुटुंबांना पुरविणे नाकीनऊ आले आहे. हे धान्य साठविण्याची गोदामे चार महिन्यांपासून अंधारात असल्याची माहितीही उजेडात येत आहे. दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणार्‍या कुटुंबांना शासनाकडून ५रुपये किलो तांदुळ, ३ रुपये किलो गहू, २ रुपये किलो भरड धान्य देण्याची अन्न सुरक्षा योजना जानेवारी महिन्यापासून सुरू झाली. यामध्ये ज्याचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांपेक्षा कमी असेल त्यालाही या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र जिल्हा पुरवठा शाखेकडून शहापुरातील अंत्योदय लाभधारकांसाठींची ४ हजार ५६० क्ंिवटल इतकी मागणी असताना मात्र १ हजार २०० क्विंटल इतकाच पुरवठा करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तांदुळ व गहू यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे धान्य साठविण्याच्या गोदामाची वीजबिल न भरल्याच्या कारणामुळे चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे उंदिर, घुशी यांचे प्रश्न वाढले आहे. शिवाय कामगारांना अंधारात चाचपडतच काम करावे लागते. रेशनिंगवर मिळणारे गोडेतेल, खोबरेल तेल, साबण, रॉकेल डाळी, चहापावडर नामशेष झाल्या. तर साखरही त्याच पंक्तींत आहे. भविष्यात रेशनिंगही त्याच मार्गावर जात असल्यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक दमछाक होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Warehouse for four months in the dark