‘एमजीएम’मध्ये स्वाइनसाठी वॉर्ड

By Admin | Updated: February 24, 2015 00:58 IST2015-02-24T00:58:49+5:302015-02-24T00:58:49+5:30

स्वाइन फ्लू प्रतिबंधक व नियंत्रणाबाबत उपाययोजनांसाठी पनवेल नगरपरिषद व ग्रामीण रु ग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी आमदार प्रशांत ठाकूर

Ward for Swine in MGM | ‘एमजीएम’मध्ये स्वाइनसाठी वॉर्ड

‘एमजीएम’मध्ये स्वाइनसाठी वॉर्ड

पनवेल : स्वाइन फ्लू प्रतिबंधक व नियंत्रणाबाबत उपाययोजनांसाठी पनवेल नगरपरिषद व ग्रामीण रु ग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी एमजीएम रुग्णालयात २० बेड आणि इतर यंत्रणा सज्ज ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
स्वाइन फ्लूबाबत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान कामोठेमधील खाजगी डॉंक्टरांनी एमजीएम कामोठे रु ग्णालय स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची काळजी घेत नाहीत, तसेच उपचारांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला. आमदार ठाकूर यांनी एमजीएममधील वैद्यकीय अधिक-यांना चौकशीचे आदेश दिले. कामोठे येथील एमजीएम रु ग्णालयाच्या ठिकाणी स्वाइन फ्लूवर उपचारासाठी २० बेड, त्यामध्ये आँक्सिजन मॉनिटरिंग, व्हेंटीलेटर, वैद्यकीय अधिकारी अशी २४ तास सेवा उपलब्ध करु न देण्यात आली आहे, तसेच ग्रामीण रुग्णालय पनवेल याठिकाणी देखील प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आले आहेत.
या बैठकीला पनवेलच्या नगराध्यक्ष चारु शीला घरत, डॉं. बी. एस. लोहारे, उपमुख्याधिकारी चारु शीला पंडित, पनवेलचे उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार पवन चांडक, गटविकास अधिकारी राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष मदन कोळी, नगरसेवक लतीफ शेख आदीसह शासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Ward for Swine in MGM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.