प्रभाग आरक्षणाचा दिग्गजांना फटका
By Admin | Updated: February 5, 2015 01:00 IST2015-02-05T01:00:56+5:302015-02-05T01:00:56+5:30
महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ७ फेब्रुवारी रोजी प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
प्रभाग आरक्षणाचा दिग्गजांना फटका
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ७ फेब्रुवारी रोजी प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीद्वारे पडणाऱ्या आरक्षणाचा फटका गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांसह सध्या प्रतिनिधीत्व करीत असलेल्या अनेक दिग्गजांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सन २0११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार महापालिका क्षेत्राची लोकसंख्या ११ लाख २0 हजार इतकी नोंदविण्यात आली आहे. वाढलेल्या या लोकसंख्येच्या अधारे यावेळी महापालिकेच्या प्रभाग संख्येतही वाढ झाली आहे. सन २0१0 मध्ये झालेल्या महापालिका निवडणूकीसाठी ८९ प्रभाग होते. यावेळी त्यात वाढ होऊन ते १११ इतके करण्यात आले आहेत. प्रभागांच्या वाढलेल्या संख्येनुसार प्रभाग रचनेतही बदल होणार आहेत. या बदलाचा फटका अनेक विद्यमान नगरसेवकांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय गणिते काहीसी बदलताना दिसत आहेत. दोन दशकांपासून महापालिकेवर एक हाती सत्ता राखणारे माजी मंत्री गणेश नाईक यांना या दोन्ही निवडणुकांमध्ये धक्का बसला आहे. यापार्श्वभूमीवरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीची समिकरणे जुळविली जात आहेत. दरम्यान, अशीच परिस्थिती कायम राहिली तर आपले काही खरे नाही, अशी भिती महापालिकेतील सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना व इच्छुकांना सतावत आहेत. त्यामुळे अनेक जण पर्यायी किंबहुना पक्षांतराच्या मार्गावर आहेत. यातच नाईक हे स्वत:च पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहेत. मात्र याबाबत त्यांनी कमालीचे मौन बाळगल्याने कार्यकर्त्यांत आणखीनच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे निवडणूक लढवायची, घरी बसायचे किंवा पत्नीसाठी उमेदवारी मागून आपली राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करायची, याबाबतच्या निर्णय प्रक्रियेला प्रभाग आरक्षण निश्चितीनंतरच गती येईल, असे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)
च्शनिवारी होणाऱ्या सोडतीद्वारे अनुसुचित जाती महिला, अनुसुचित जमाती महिला, मागासवर्ग प्रवर्ग, मागासवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
च्त्यामुळे कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडते याची उत्सुकता आजी माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुकांना लागली आहे.दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेत महिलांसाठी कोणते प्रभाग राखीव ठेवले जातात हे त्या प्रभागातील विद्यमान नगरसेवकांसाठी निर्णायक ठरणार आहे.