प्रभाग क्रमांक ४० मध्ये ३०० नागरिकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST2021-06-18T04:06:31+5:302021-06-18T04:06:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ४० मध्ये लसीकरण मोहिमेचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. ...

प्रभाग क्रमांक ४० मध्ये ३०० नागरिकांनी घेतली लस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ४० मध्ये लसीकरण मोहिमेचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी १८ वर्षांवरील व्यक्तींनी लसीकरणाचा लाभ घेतला. दिवसभरात एकूण ३०० लस देण्यात आल्या. व्हॅलेंटाईन टॉवर सोसायटीमार्फत ५० गरजू नागरिकांचे यावेळी मोफत लसीकरण करण्यात आले.
व्हॅलेंटाईन टॉवर या गृहनिर्माण सोसायटीचे सचिव हेमंत शिंदे यांनी क्लाऊड नाईन या खासगी हॉस्पिटलमार्फत व्हॅलेंटाईन अपार्टमेंट व त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकरिता एकदिवसीय कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या लसीकरण मोहिमेला मुंबईचे उपमहापौर व प्रभाग क्र. ४० चे नगरसेवक अॅड. सुहास चंद्रकांत वाडकर यांनी उपस्थिती दर्शविली व सर्वांचे कौतुक केले.
या सोसायटीच्या जागेतच लस मिळाल्याने येथील तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिक खूश होते. दिंडोशीत आता पालिकेच्या परवानगीने अनेक गृहनिर्माण सोसायट्या या लसीकरण मोहीम राबविण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे.
-------------------------- -----------