वारंगी, वाघेरीमधील दूरध्वनी तीन महिन्यांपासून ठप्प

By Admin | Updated: August 10, 2014 23:13 IST2014-08-10T23:09:13+5:302014-08-10T23:13:10+5:30

महाड तालुक्यातील दुर्गम भागात दूरसंचार विभागाने डब्लू एल एल प्रकारातील दूरध्वनीची सुविधा निर्माण करून दिली.

Warangi, Wagheri jumped the phone for three months | वारंगी, वाघेरीमधील दूरध्वनी तीन महिन्यांपासून ठप्प

वारंगी, वाघेरीमधील दूरध्वनी तीन महिन्यांपासून ठप्प

महाड : महाड तालुक्यातील दुर्गम भागात दूरसंचार विभागाने डब्लू एल एल प्रकारातील दूरध्वनीची सुविधा निर्माण करून दिली. मात्र ही सुविधा रडतखडत चालत असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे. या विभागात गेल्या तीन महिन्यांपासून ही सुविधा ठप्प असून तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या अधिकाऱ्यांचे खाजगी कंपन्यांजवळ साटेलोटे तर नाही ना असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.
ग्रामीण भागात दूरध्वनी पोहोचले पाहिजेत या हेतूने दूरसंचार विभागाने या विभागात वायर न टाकता टॉवरद्वारे डब्लू एल एल या प्रकारातील लँडलाईन दिले. या विभागात किमान १०० ते १२० अशा प्रकारचे दूरध्वनी आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून हे दूरध्वनी ठप्प आहेत. अनेकवेळा चालू बंद अशा अवस्थेत हे दूरध्वनी कार्यरत असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांना संपर्क साधणे कठीण झाले आहे. शिवाय मुळातच हा विभाग ग्रामीण आणि दुर्गम असल्याने ऐन पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीत दूरध्वनी सुविधा चालू रहावी, असे आदेश जिल्हाधिकारी आपत्कालीन बैठकांमधून करत असताना अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.

Web Title: Warangi, Wagheri jumped the phone for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.