‘एमबीए’त करिअर करायचेय ?

By Admin | Updated: February 16, 2017 02:22 IST2017-02-16T02:22:43+5:302017-02-16T02:22:43+5:30

पदवी प्राप्त केल्यानंतर कॉर्पाेरेट सेक्टरमध्ये करिअर करण्याची इच्छा अनेक विद्यार्थ्यांमध्ये असते. ज्या पदवीधारक विद्यार्थ्यांना ‘एमबीए’ करायचे

Want to have a career in MBA? | ‘एमबीए’त करिअर करायचेय ?

‘एमबीए’त करिअर करायचेय ?

मुंबई : पदवी प्राप्त केल्यानंतर कॉर्पाेरेट सेक्टरमध्ये करिअर करण्याची इच्छा अनेक विद्यार्थ्यांमध्ये असते. ज्या पदवीधारक विद्यार्थ्यांना ‘एमबीए’ करायचे आहे, पण त्याविषयी योग्य माहिती नाही, अशा विद्यार्थ्यांना ‘लोकमत’ आणि कोहिनूर बिझनेस स्कूल (केबीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘व्हिजन एमबीए २०१७’ या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.
२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा असून, १८ फेब्रुवारी रोजी दादर येथील श्रीसंत सेना महाराज सभागृहात सकाळी १०:३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे. कार्यशाळेत परीक्षेत यश कसे मिळवावे, अधिकाधिक गुण कसे मिळवावेत, लेखी परीक्षेत गुणांची टक्केवारी कशी वाढवावी, हर्बल, लॉजिकल रिझनिंग क्वॉन्टिटेटिव्ह पद्धतीचे प्रश्न, त्याचबरोबर करिअर प्लॅनिंग, बी स्कूलची निवड, यावर प्रशिक्षित मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Want to have a career in MBA?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.