डोंगराची भिंत कोसळली

By Admin | Updated: July 13, 2014 02:04 IST2014-07-13T02:04:49+5:302014-07-13T02:04:49+5:30

गेल्या 24 तासांपासून पडणा:या जोरदार पावसामुळे घाटकोपर येथील असल्फा परिसरातील डोंगराच्या भिंतीचा काही भाग कोसळला.

The wall of the hill collapses | डोंगराची भिंत कोसळली

डोंगराची भिंत कोसळली

मुंबई : गेल्या 24 तासांपासून पडणा:या जोरदार पावसामुळे घाटकोपर येथील असल्फा परिसरातील डोंगराच्या भिंतीचा काही भाग कोसळला. त्यानंतर प्रशासनाने त्या ठिकाणी धोकादायक असल्याची नोटीस लावून जबाबदारी संपवली आहे. रहिवासी मात्र मदतीची अपेक्षा बाळगून बसले आहेत.   
घाटकोपर असल्फा डोंगराळ परिसरात गेल्या 2क् ते 25 वर्षापासून शेकडो रहिवासी वास्तव्यास आहेत. त्यात डोंगरापासून संरक्षण म्हणून अठरा वर्षापूर्वी डोंगराभोवती संरक्षण भिंत उभारण्यात आली. मात्र सद्य:स्थितीत डोंगराभोवतालच्या परिसरात बांधलेल्या सरंक्षण भिंती ढासळत असल्यामुळे स्थानिकांच्या घरांचे छप्पर, भिंती पडल्या आहेत. त्यामुळे घरातील सामानाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, या विदारक परिस्थितीमुळे त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली असल्याचे स्थानिक लतीश यादव यांनी सांगितले. 
प्रशासनाने या प्रकाराची दखल घेण्याऐवजी घटनेच्या दोन दिवसानंतर सदर ठिकाणी धोकादायक नोटीस लावून काढता पाय घेतला असल्याचेही स्थानिकांचे म्हणणो आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास डोंगरावरील मोठा दगड कोसळून यादव यांच्या घराचे नुकसान झाले. 
वयोवृद्ध आईबाबा आणि कुटुंबीयांसमवेत त्यांना रस्त्यावर गुजराण करावी लागत आहे. त्यात झाडेही मुळासकट खाली कोसळत आहेत. त्यामुळे स्थानिकांनी सतर्कता म्हणून घरातूनच बाहेर पडावे लागले आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: The wall of the hill collapses