वाजू लागले महापालिका निवडणुकीचे पडघम

By Admin | Updated: March 7, 2015 01:58 IST2015-03-07T01:58:17+5:302015-03-07T01:58:17+5:30

मुंबईच्या रस्त्यांवरून राजकारण दरवर्षीच तापते. आता तर पालिकेच्या निवडणुकांचे वेध लागल्याने खड्ड्यांचा विषय चांगलाच तापणार असल्याचे आत्तापासून स्पष्ट होत आहे.

Wajoo got municipal elections fall | वाजू लागले महापालिका निवडणुकीचे पडघम

वाजू लागले महापालिका निवडणुकीचे पडघम

रस्त्यांच्या कामांना शिवसेनेचे प्रशस्तिपत्रक : कमी बोलीच्या कंत्राटामुळे दर्जाबाबत साशंकता
मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवरून राजकारण दरवर्षीच तापते. आता तर पालिकेच्या निवडणुकांचे वेध लागल्याने खड्ड्यांचा विषय चांगलाच तापणार असल्याचे आत्तापासून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे निवडणुकांमुळेच यंदा पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांच्या डागडुजीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यात महापालिकेच्या कारभारात कमालीचा रस घेणाऱ्या युवराज आदित्य ठाकरे यांनी रस्त्यांच्या कामाला प्रशस्तिपत्रकही देऊन टाकले आहे. बुधवारी रात्री पाहणी दौऱ्यात रस्त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत यंदाच्या पावसाळ्यात मुंबई खड्डेमुक्त करण्याची हमी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली़
खर्चापेक्षा कमी बोली लावणाऱ्या ठेकेदारांनाच कंत्राट देण्याचा सपाटा शिवसेना-भाजपा युतीने लावला आहे़ पावसाळ्यापूर्वीच रस्ते व खड्डे दुरुस्तीसाठी ७ परिमंडळांत
प्रत्येकी २० कोटींच्या कंत्राटांची खैरात ५० टक्क्यांपर्यंत कमी खर्चात करणाऱ्या ठेकेदारांना वाटण्यात आली़
विशेष म्हणजे अशा कंत्राटामुळे पालिकेच्या विश्वासार्हतेवर भाजपा सदस्याने प्रश्नचिन्ह उभे केले असताना बहुमताच्या जोरावर युतीने हे प्रस्ताव मंजूर केले़ त्याच रात्री आदित्य
ठाकरे यांनी ए विभागात मरिन ड्राइव्ह, डी वॉर्डमध्ये ब्रीच कॅण्डी, भुलाभाई देसाई मार्ग, एफ
दक्षिण - जी़डी़ आंबेकर मार्ग, एफ उत्तर - डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, खार पश्चिम या रस्त्यांची पाहणी केली़
या रस्त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत या कामांचा आनंद मुंबईकर ४० वर्षे घेतील, असा दावा ठाकरे यांनी केला़ या दौऱ्यात महापौर स्नेहल आंबेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)

मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी
३ वर्षांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे़ त्यानुसार साडेसात हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ पावसाळ्यापूर्व रस्त्यांच्या कामांसाठी ७ परिमंडळांकरिता प्रत्येकी २० कोटींची तरतूद आहे.

डागडुजीसाठी २ कोटींची कामे नुकतीच मंजूर केली. रस्त्यांची कामे पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा निम्म्या खर्चात करण्यास तयार ठेकेदारांना देण्यात येत आहेत़ त्यामुळे कालांतराने वाढीव बिले सादर करणे अथवा निकृष्ट दर्जाचे
काम हे ठेकेदार करीत असतात़

1300
ठिकाणी आजच्या घडीला रस्त्यांची कामे सुरू आहेत़ यापैकी ५३५ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत़

Web Title: Wajoo got municipal elections fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.