‘जलयुक्त’ला प्रतीक्षा निधीची

By Admin | Updated: May 28, 2015 22:54 IST2015-05-28T22:54:16+5:302015-05-28T22:54:16+5:30

मोदींच्या स्वप्नातील जलयुक्त शिवार अभियानासाठी रायगड जिल्ह्याला ५३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील ४५ गावांसाठी आतापर्यंत तिजोरीत सुमारे नऊ कोटी ४९ लाख रुपयेच पडले आहेत.

Waiting fund for 'Jalakti' | ‘जलयुक्त’ला प्रतीक्षा निधीची

‘जलयुक्त’ला प्रतीक्षा निधीची

आविष्कार देसाई ल्ल अलिबाग
मोदींच्या स्वप्नातील जलयुक्त शिवार अभियानासाठी रायगड जिल्ह्याला ५३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील ४५ गावांसाठी आतापर्यंत तिजोरीत सुमारे नऊ कोटी ४९ लाख रुपयेच पडले आहेत. उर्वरित निधी हा विविध कंपन्यांच्या खिशातून वसूल करण्यात येणार असून अद्याप त्यांनी एक रुपयाही दिलेला नाही. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सरकारकडून २०१६ ही डेडलाइन देण्यात आली असल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने कंपन्यांचे जाळे पसरलेले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून कंपन्यांनी त्या त्या ठिकाणी आपापल्या उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम सीएसआर (कॉपोरेट सोशल रिस्पॉनसिबीलीटी) फंड खर्च करणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यातील कंपन्या आपला सीएसआर खर्च करतात की नाही याबाबत नेहमीच संशयाचे वातावरण राहिले आहे. त्यामुळे सरकारच्या चांगल्या योजनेसाठी कंपन्यांच्या खिशातून जनतेच्या हक्काचे पैसे काढले, तर त्यात बिघडले कुठे असा सूर जिल्हा भाजपामध्ये आळविला जात आहे.
दस्तुरखुद्द पालकमंत्री प्रकाश मेहता यांनीच कंपन्यांनी जलयुक्त शिवार अभियानासाठी सीएसआरच्या माध्यमातून भरघोस निधी द्यावा, असे आवाहन मध्यंतरी केले होते. अद्याप त्यावा म्हणावा तसा प्रतिसाद लाभलेला नाही. जमेची बाजू म्हणजे शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था संस्था आणि मुंबईच्या सिध्दिविनायक संस्थानने प्रत्येकी एक कोटी रुपयांचा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे नुकताच सुपूर्द केला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या तिजोरीत नऊ कोटी ४९ लाख रुपये पडले आहेत.
जिल्ह्यातील १५ तालुक्यातील एक हजार १९७.९५ हेक्टर क्षेत्रावरील ४५ गावांमध्ये सात हजार ३८० कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. पैकी ८६२ कामे सुरु करण्यात आली असून त्यापैकी ८११ कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी ५३ कोटी ३७ लाख रुपयांची आवश्यकता आहे.
सरकारकडून १७ कोटी ९३ लाख रुपये प्राप्त होणार असून आतापर्यंत त्यातील ७ कोटी ४९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी कंपन्यांच्या सीएसआरमधून घेण्यात येणार
आहे.

च्महाड तालुक्यात आठ, पेण, मुरुड, माणगाव आणि पोलादपूर येथील प्रत्येकी चार गावे, श्रीवर्धन, पाली, रोहे, कर्जत येथील प्रत्येकी तीन गावे, खालापूर, पनवेल, तळा आणि म्हसळा येथील प्रत्येकी दोन अलिबाग तालुक्यातील फक्त एका गावाचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला आहे.
च्अलिबाग, पेण, खालापूर, पनवेल, कर्जत, माणगाव, तळा, रोहे, पाली, म्हसळा आणि श्रीवर्धन या तालुक्यातील कामे पूर्ण झाली आहेत.
च्मुरुड दोन कामे पूर्ण झाली असून एक काम सुरु आहे. महाड दोन कामे पूर्ण आणि तीन कामे सुरु, पोलादपूर या तालुक्यात एक पूर्ण आणि दोन कामे प्रगतिपथावर असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Web Title: Waiting fund for 'Jalakti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.