प्रतीक्षा निवडणूक निकालाची
By Admin | Updated: October 18, 2014 22:23 IST2014-10-18T22:23:25+5:302014-10-18T22:23:25+5:30
रायगड जिल्हय़ातील सात विधानसभा क्षेत्रंतील निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर होणार आहेत.

प्रतीक्षा निवडणूक निकालाची
अलिबाग : रायगड जिल्हय़ातील सात विधानसभा क्षेत्रंतील निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर होणार आहेत. निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत उमेदवारांसह जनतेमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कजर्त, महाड आणि श्रीवर्धन या सात विधानसभा क्षेत्रंमधील एकूण 88 उमेदवार आहेत. पनवेलमध्ये भाजपाचे प्रशांत ठाकूर आणि शेकापचे बाळाराम पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उरणमध्ये शेकापचे विवेक पाटील, शिवसेनेचे मनोहर भोईर, कजर्त-राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड, शिवसेनेचे हनुमंत पिंगळे, पेण- काँग्रेसचे रवींद्र पाटील, शेकापचे धैर्यशील पाटील, अलिबाग - काँग्रेसचे मधुकर ठाकूर, शेकापचे सुभाष तथा पंडित पाटील, शिवसेनेचे महेंद्र दळवी, महाडमध्ये शिनसेनेचे भरत गोगावले, काँग्रेसचे माणिक जगताप, श्रीवर्धनमध्ये अवधूत तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला आहे.
आज ठरणार भविष्य उमेदवारांचे
मोहोपाडा : बुधवारी मतदानाची प्रकिया पूर्ण झाल्यावर आता निकालाकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. उमेदवारांसह पक्ष कार्यालयातही संभ्रमाचे वातावरण आहे. मतदारांमध्ये कोण विजयी होणार, या चर्चेस ऊत आला आहे.
25 वर्षानंतर युतीने आणि 15 वर्षानंतर आघाडीने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वच मतदारसंघांत बहुरंगी लढती पाहावयास मिळाल्या. परंतु मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता सर्वाचे भवितव्य मतदान यंत्नात बंद झाले आहे.
उद्या, (19 ऑक्टोबर) मतमोजणीच्या प्रक्रि येनंतर दुपार्पयत कोणाचा विजय झाला, हे स्पष्ट होणार आहे. तोर्पयत उमेदवारांची धाकधूक सुरू राहणार असून या दिवशी मतदान केंद्राबाहेर असलेली गर्दी, कोणता समाज मोठय़ा संख्येने मतदानाला घराबाहेर पडला, त्या मतदारसंघाची राजकीय स्थिती याचे आखाडे बांधत मतदारांमध्ये आता शहराचा प्रभाग असलेल्या मतदारसंघांत विजयाची बाजी कोण मारणार, याबाबतच्या चर्चेस वेग आला आहे.
महाडमध्ये मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त
च्महाड : महाड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे होणार असून, यासाठी आवश्यक ती शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून आले.
च्सकाळी 8 वा. पासून मतमोजणीस सुरुवात होणार असून, या ठिकाणी 15 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी 1 टेबल पोस्टल मतांसाठी, तर 14 टेबलांवर ईव्हीएम मशिनवरील मतमोजणी होणार आहे.
च्मतमोजणीच्या एकूण 28 फे :या होणार असून, मतदानानंतर 386 मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे राष्ट्रीय स्मारकामधील स्ट्राँगरूममध्ये कडेकोट सुरक्षेमध्ये ठेवण्यात आलेली आहेत.
च्सीआयएसएफच्या प्लाटनसह तीन पोलीस निरीक्षक, 2 साहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 उपनिरीक्षक आणि 32 पोलीस कर्मचारी रात्रंदिवस पहारा करीत आहेत.
च्महाड मतदारसंघातील 2 लाख 68 हजार 134 मतदारांपैकी 1 लाख 8क् हजार (67.39 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदारसंघात एकूण आठ उमेदवार असले तरी खरी लढत शिवसेनेचे भरत गोगावले आणि काँग्रेसचे माणिक जगताप यांच्यातच होणार असल्याचे सर्वाचे लक्ष लागून आहे.