काळ्या यादीला ठेकेदाराची प्रतीक्षा
By Admin | Updated: July 12, 2014 00:29 IST2014-07-12T00:29:23+5:302014-07-12T00:29:23+5:30
अंबरनाथ नगरपरिषदेतील ज्या ठेकेदारांनी आपली कामे वेळेत पूर्ण केलेली नाही अथवा ज्यांनी कामे निकृष्ट केली आहेत

काळ्या यादीला ठेकेदाराची प्रतीक्षा
पंकज पाटील - अंबरनाथ
अंबरनाथ नगरपरिषदेतील ज्या ठेकेदारांनी आपली कामे वेळेत पूर्ण केलेली नाही अथवा ज्यांनी कामे निकृष्ट केली आहेत अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई गेल्या दोन वर्षात झालेलीच नाही. पालिका प्रशासनाचा ठेकेदारांवर अंकुश नसल्याने येथील काळ्या यादीलाच ठेकेदारांची प्रतिक्षा लागली आहे.
अंबरनाथ नगपरिषदेतील महत्वाचा आणि शिवसेना भाजपा युतीसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरलेल्या शिवाजी चौक ते स्वामी समर्थ चौक या रस्त्याचे काँक्रिटीकरण गेल्या चार वर्षात पूर्ण झालेलाच नाही. पाच कोटीहून अधिक तरतूद या रस्त्यासाठी केली होती. शंभो कंस्ट्रक्शन कंपनीच्या नावावर येथील सत्ताधारी शिवसेनेच्याच पदाधिका-यांनी ही कामे घेतली आहेत. आर्थिक क्षमता नसतांनाही त्या कार्यकत्र्याना कामे दिल्याने शिवसेनेसाठी आज हा मुद्दा अडचणीचा ठरत आहे. स्वामी समर्थ चौक ते वडवली वेल्फेअर सेंटर्पयतचाच रस्ता संबंधीत ठेकेदाराने कसाबसा पूर्ण केला. त्यातही कामाचा दर्जा निकृष्ट. त्या कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करित पालिकेने संबंधीत ठेकेदाराला काम करण्याची संधी अनेक वेळा दिली. दीड वर्ष झाले तरी ठेकेदाराने हे काम पूर्ण केलेले नाही. तरी देखील झालेल्या कामाचे बील संबंधीत ठेकेदाराला वेळेवर देण्यास पालिका प्रशासन चुकले नाही. तरी देखील काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करणा-या ठेकेदारावर कारवाई करण्यास चालढकल होत आहे. शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते असो की नगराध्यक्ष असो यांनी संबंधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आश्वासन गेल्या दोन वर्षापासून दिले आहे. मात्र कारवाई करणार कशी, कारण काम करणारे ठेकेदार हे शिवसेनेचे आहेत. एकमेकांना सांभाळण्याच्या नादात शिवाजी चौकातील रस्ता मात्र तसाच अर्धवट पडला आहे. काळ्या यादीची धमकी देणा:या सत्ताधारी आणि पालिका प्रशासनात ठेकेदारावर कारवाई करण्याची धमक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच पालिका प्रशासनाला आता ठेकेदारांची प्रतिक्षा करावी लागत आहे.
या संदर्भात कार्यकारी अभियंता राजेश तडवी यांना विचारले असता ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय हा सर्वसाधारण सभेत घेण्यात येतो. प्रशासनाने या संदर्भात अहवाल पाठविला आहे, असे त्यांनी सांगितले.
अधिका:यांचे सोयीस्कर दुर्लक्ष
च्ज्या शंभो कंस्ट्रक्शन कंपनीच्या नावावर काँक्रिट रस्त्याचे काम घेण्यात आले आहे, त्याच कंपनीच्या नावावर यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाचे काम घेण्यात आले आहे. खुल्या नाटय़गृहाच्या या कामात अंबरनाथच्या बडय़ा राजकीय पुढा-यांची भागिदारी आहे.
च्त्यामुळे काँक्रिटीकरणाच्या कामावरून या कंपनीला काळ्या यादीत टाकल्यास चव्हाण नाटय़गृहाचे कामही त्या कंपनीच्या हातातून जाण्याची भीती आहे. त्यामुळेच या शंभो कंस्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्यास चालढकल होत आहे. व अधिकारी देखील त्याकडे सोयीने दुर्लक्ष करित आहेत.