वसईतला ब्रिटीशपूल डागडुजीच्या प्रतिक्षेत
By Admin | Updated: September 8, 2014 00:32 IST2014-09-08T00:32:26+5:302014-09-08T00:32:26+5:30
जलवाहतुक सुरू करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे. मात्र या वसई विरारला रेल्वे समांतर रस्ता होण्याच्या मागणीला आता कायमचा हरताळ फासल्याचे दिसून येते.

वसईतला ब्रिटीशपूल डागडुजीच्या प्रतिक्षेत
नायगांव : नायगांवहुन खाडीमार्गे भार्इंदर येथे पोहोचण्यासाठी जलवाहतुक सुरू करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे. मात्र या वसई विरारला रेल्वे समांतर रस्ता होण्याच्या मागणीला आता कायमचा हरताळ फासल्याचे दिसून येते. २ कि.मी अंतरात येणाऱ्या खाड्या हा मुख्य अडसर ठरत असल्याने जुना ब्रिटीशपुल डागडुजी करून वापरात आणण्याची मागणी अनेक वर्षापासुन करण्यात आली होती.
हा पुल सुरू झाला असता तर मुंबई अगदी हाकेच्या अंतरावर आली असती. लोकलशिवाय सहज, सुलभ पर्याय वसइकरांना नाही. महामार्गाने प्रवास करण म्हणजे वेळ, इंधन, श्रम खर्ची घालावे लागतात. अनेकदा रुग्णांना मुंबईत नेणे-आणणे यात तोठे परीश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे उपलब्ध पुल हलक्या वाहनांना खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले होते. परंतु ते अपयशी ठरले. राज्य रस्ते विकास महामंडळाने सन २०१० मध्ये याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी ‘मेसर्स कन्सलटंट प्रायव्हेट लि.’ या कंपनीची मदत घेण्यात आली होती. २ कि. मी. लांबीच्या सदर दोन पुलांना तब्बल २७२.५ कोटी रू. खर्च अपेक्षीत होता.
इतका निधी उपलब्ध होऊ न शकल्याने सदर प्रस्ताव बारगळला. तृर्तास वसई, विरार परीसरातील नागरीकांना प्रवासासाठी सुलभ पर्याय नाही. अनेकदा ही विकासकाम केंद्रातुन करण्यात येईल असा विश्वास राजकीय पक्षांनी दिला. प्रत्यक्षात काहीच हालचाल झाली नाही.
आता जलवाहतुकीचा पर्याय समोर आला आहे. निवडणुकीचं धुमशान अल्पावधीत सुरू होणार आहे. त्यात हा पर्यायही मतदारांची दिशाभुल करणारा न ठरावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.