बारमध्ये ग्राहकाकडून वेटर तरुणीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:07 IST2021-03-16T04:07:37+5:302021-03-16T04:07:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सोबत आली नाही, म्हणून ग्राहकाने वेटर तरुणीच्या गालावर वार करून तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक ...

The waiter attacks the young woman from the customer in the bar | बारमध्ये ग्राहकाकडून वेटर तरुणीवर हल्ला

बारमध्ये ग्राहकाकडून वेटर तरुणीवर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सोबत आली नाही, म्हणून ग्राहकाने वेटर तरुणीच्या गालावर वार करून तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना ग्रंँट रोड येथील बारमध्ये घडली. तरुणीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी डी.बी. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

ग्रंँट रोड येथील पूजा ऑर्केस्ट्रा आणि बारमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. ग्राहकाने दारूच्या नशेत वेटर तरुणीला सोबत येण्याचा आग्रह धरला. तिने नकार देताच, तिच्या गालावर वार केले, अन्य कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे तरुणी थोडक्यात वाचली. तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी डी.बी. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत ग्राहकाला ताब्यात घेतले असून, ते अधिक तपास करत आहेत.

Web Title: The waiter attacks the young woman from the customer in the bar