रमझान संपेर्पयत आरोपीने पाहिली वाट
By Admin | Updated: August 10, 2014 02:40 IST2014-08-10T02:40:24+5:302014-08-10T02:40:24+5:30
एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या करणा:या हारून शेख (23) या तरुणाने रमझान संपेर्पयत प्लॅन पुढे ढकलला. ईद साजरी केल्यानंतर संधी मिळताच त्याने या तरुणीची सपासप वार करून निर्घृणपणो हत्या केली.

रमझान संपेर्पयत आरोपीने पाहिली वाट
>मुंबई : एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या करणा:या हारून शेख (23) या तरुणाने रमझान संपेर्पयत प्लॅन पुढे ढकलला. ईद साजरी केल्यानंतर संधी मिळताच त्याने या तरुणीची सपासप वार करून निर्घृणपणो हत्या केली. हत्येनंतर पळून जाणा:या शेखला एका सतर्क रिक्षाचालकाच्या मदतीने विक्रोळी पोलिसांनी गजाआड केले. न्यायालयाने त्याला 14 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत धाडले आहे.
अफसाना मोहम्मद मुमताज चौधरी (18) असे मृत तरुणीचे नाव असून काल विक्रोळी, टागोरनगर येथील राहत्या घराजवळ तिची शेखने खांडोळी केली. गेल्या चारेक वर्षापासून शेख अफसानावर एकतर्फी प्रेम करत होता. दीड महिन्यापूर्वी धाडस करून त्याने अफसानाचे घर गाठले आणि थेट तिच्या आईवडिलांकडेच लग्नाची मागणी घातली. मात्र पालकांनी शेखची मागणी धुडकावून लावली. त्यानंतर शेखने रोजे सुरू होण्यापूर्वी अफसानाला रस्त्यात अडवून प्रत्यक्ष मागणी घातली. मात्र तिनेही त्याला उडवून लावले आणि शेखची तक्रार स्थानिक तरुणांकडे केली. या तरुणांनी दम भरून शेखला तेथून पळवून लावले. यामुळे शेख भडकला. त्याने अफसानाच्या हत्येचा कट आखला. मात्र तेवढय़ात रमझानचा महिना सुरू झाल्याने शेख संभ्रमीत झाला. अखेर रमजानच्या सणात वाईट काम करू नये या विचाराने त्याने प्लॅन पुढे ढकलला, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक दिनेश देसाई यांनी दिली.