वाडा ड्रग्जप्रकरणी तिघांचा जामीन फेटाळला
By Admin | Updated: March 31, 2017 05:30 IST2017-03-31T05:30:08+5:302017-03-31T05:30:08+5:30
पालघर जिल्ह्यातील वाड्यामधील एका फार्महाउसवर कारवाईदरम्यान जप्त केलेल्या २८ कोटींच्या ड्रग्जप्रकरणी

वाडा ड्रग्जप्रकरणी तिघांचा जामीन फेटाळला
ठाणे : पालघर जिल्ह्यातील वाड्यामधील एका फार्महाउसवर कारवाईदरम्यान जप्त केलेल्या २८ कोटींच्या ड्रग्जप्रकरणी ठाणे न्यायालयाने गुरुवारी तिघांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कारवाई केलेल्या ठिकाणी तयार होणाऱ्या ड्रग्जची परदेशात विक्री होत होती. तसेच तपासाअंती या तिघांना अटक करण्यात वाडा पोलिसांना यश आले आहे.
सचिन आत्माराम वर्तक (५४) रा. पालघर, मोबीन अहमद शेख (४६) रा. मुंबई आणि कालिकाप्रसाद नुखई मल्हार (३३) रा. नालासोपारा अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. सचिन आणि त्याच्या साथीदाराच्या मालकीची जागा असून ती त्यांनी गुप्तानामक व्यक्तीच्या नावे असल्याचे दाखवून तेथे ड्रग्ज तयार करण्याचे काम सुरू केले होते. याचदरम्यान, आरोपींनी जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. त्याची सुनावणी पटवर्धन यांच्यासमोर झाली. (प्रतिनिधी)