‘वडा’ने 12 तास अडविला श्रीनगरचा रस्ता
By Admin | Updated: August 5, 2014 00:23 IST2014-08-05T00:23:54+5:302014-08-05T00:23:54+5:30
शहरात वृक्ष पडण्याची मालिका सुरुच आहे. त्यातच वागळे इस्टेट, श्रीनगर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास वडाचे जुने झाड उन्मळून पडले.

‘वडा’ने 12 तास अडविला श्रीनगरचा रस्ता
ठाणो : शहरात वृक्ष पडण्याची मालिका सुरुच आहे. त्यातच वागळे इस्टेट, श्रीनगर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास वडाचे जुने झाड उन्मळून पडले. यामध्ये दोन वाहनांचे नुकसान झाले असून हे झाड हटविण्यासाठी तब्बल 12 तास लागले.
या परिसरात पर्यायी रस्ते असल्याने वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला नसल्याचे चित्र दिसत होते. हे वडाचे वृक्ष 5क्-6क् वर्ष जुने असून त्याला हटविण्यासाठी ठामपा अगिAशमन दलाच्या जवानासह आपत्ती व्यवस्थापन आणि वृक्ष प्राधिकरण विभागातील 2क् ते 25 जण प्रय} करीत होते. त्यांच्या या प्रय}ाला 12 तासांनंतर यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली.
तसेच ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागात मागील 24 तासात 18 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये झाडे पडण्याच्या क्6 तक्रारी दाखल आहेत. आगीची क्1, झाडांच्या फांद्या पडण्याच्या क्2 तर भिंती पडण्याची क्1 आणि अन्य क्8 तक्रारी आल्या आहेत. (प्रतिनिधी)