Join us  

पाच नगर परिषदा, नगर पंचायतींसाठी २७ जानेवारीला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 5:33 AM

विविध नगर परिषदा व नगरपंचायतींमधील ११ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी २७ जानेवारी २०१९ रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी दिली.

मुंबई : कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगर परिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगर परिषदा व नगरपंचायतींमधील ११ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी २७ जानेवारी २०१९ रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी   दिली.या निवडणुकांसाठी २ ते ९ जानेवारीदरम्यान अर्ज स्वीकारले जातील. १० तारखेला छाननी तर २७ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पोटनिवडणूक होत असलेल्या नगर परिषद/ नगरपंचायतनिहाय जागा पुढीलप्रमाणे : राजापूर (जि. रत्नागिरी)- ६अ, आळंदी (पुणे)- ९अ, फलटण (सातारा)- १२अ, दुधनी (सोलापूर)- २ब, पन्हाळा (कोल्हापूर)- ८क, दिंडोरी (नाशिक)- १५, यावल (जळगाव)- १अ, बीड- ११अ, बुलडाणा- १२ब, अजुर्नी (गोंदिया)- १४, गोरेगाव (गोंदिया)- १४.

टॅग्स :निवडणूकमहाराष्ट्र