मतदार याद्यात गोंधळच
By Admin | Updated: September 17, 2014 22:28 IST2014-09-17T22:28:00+5:302014-09-17T22:28:00+5:30
यंदाच्या निवडणुकीसाठी सध्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांत पुनश्च: गोंधळाचे वातावरण असल्याचे निदर्शनास आले

मतदार याद्यात गोंधळच
राजू काळे ल्ल भाईंदर
यंदाच्या निवडणुकीसाठी सध्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांत पुनश्च: गोंधळाचे वातावरण असल्याचे निदर्शनास आले असून गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 8क् हजार वगळलेल्या मतदार नावांच्या समावेशाबाबत मात्र कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात येत नसल्याने त्यांच्या मतदान हक्काचे काय, असा प्रश्न त्या मतदारांकडुन विचारण्यात येत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत शहरातील सुमारे 8क् हजार मतदारांना याद्यांतून वगळल्याचे उजेडात आल्यानंतर स्थानिक राज्यकत्र्यानी त्या मतदारांना पुनश्च मतदानाचा हक्क प्रदान करुन त्यांचे मतदान घेण्याचा रेटा राज्य निवडणूक आयोगाकडे लावला होता. हे प्रकरण चांगलेच अंगलट आल्यानंतर त्यात दुरुस्ती करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून संबंधितांना करण्यात आली होती. त्यानंतर या नावांच्या पुर्ननोंदणीसाठी कार्यवाही झाली किंवा नाही, त्याची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलले नाही. परंतु, उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या मुदतीर्पयत मतदारांना नावातील दुरुस्ती व नवीन मतदार नोंदणी करता येणार असल्याचे निवडणूक प्रक्रीयेतील सूत्रंकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे वगळलेल्या नावांच्या पुर्ननोंदणीबाबत अनिश्चितता असून तत्पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांतही गोंधळ असल्याचे निदर्शनास आले आहे. यात अगोदरच ओळखपत्र देण्यात आलेल्या मतदारांची पुन्हा ओळखपत्रे तयार करण्यात आली असून ज्यांनी ओळखपत्रंसाठी फोटो दिले आहेत अशा कित्येक मतदारांना ओळखपत्रे अद्याप प्राप्त झालेली नसल्याचे आढळून आले आहे. तसेच गतवेळच्या मतदार याद्यांत अनेक मतदारांचे पत्ते चुकीचे नोंद केल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी करण्यात आलेल्या अर्जानंतरही तेच पत्ते कायम ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहेत. ज्या मतदारांची नोंद याद्यांत करण्यात आली आहे त्या मतदारांच्या पत्त्यांमध्ये त्यांच्या घर अथवा फ्लॅट क्रमांकासह इमारतीच्या विंगची नोंदच करण्यात न आल्याने अशी ओखळपत्रे निश्चित मतदारांर्पयत कशी पोहोचवावी, असा पेच निवडणुक कर्मचा:यांमध्ये निर्माण झाला आहे.
या गोंधळात सालाबादप्रमाणो यंदाही दुबार मतदार नोंदणी, मयत इसमांच्या नावांची नोंद, स्थलांतरीत मतदारांची नोंद जुन्या पत्त्यांवर असे प्रकारही यंदाच्या मतदार याद्यांत झाल्याची शक्यता निवडणूक सूत्रंकडून वर्तविण्यात येत आहे. यावरुन मतदार याद्या तयार करण्यासह त्याच्या छपाईवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. हा गोंधळ निस्तरण्यासाठी संबंधित मतदारांनी 27 सप्टेंबर र्पयत अर्ज क्र. 8 भरुन दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नायगाव : मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या याद्याच पोहचल्या नसल्याने बुधवारी तहसीलदार वसई कार्यालयात सावळा गोंधळ निर्माण झाला होता. शासनाची कार्यपद्धती किती ढिसाळ आहे. त्याचेही दर्शन उपस्थित अधिकारी व कर्मचा:यांना झाले.
याचा त्रस मात्र विविध ठिकाणहून आलेल्या कर्मचा:यांना झाला. नव्याने आलेले मतदार तसेच मयत मतदार हस्तांतरीत मतदारंच्या सुधारीत याद्या बुधवारी तहसील कार्यालयात येणार होत्या. त्यासाठी पालिका कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी इत्यादी कर्मचारीवर्ग सकाळी 1क्.3क् पासून येथे तैनात करण्यात आला होता. शिक्षकही त्यात सामील होते. यंत्रणोने बसण्याचीही सोय न केल्याने काहींनी येथील मंदिरात आसरा घेतला. तर काहींनी येथील झाडाखाली बस्तान बसवले. विविध ठिकाणच्या बूथवर मतदार नव्याने फॉर्मस भरण्यासाठीही येऊन परत गेले. कारण कर्मचारी तहसील कार्यालयात खोळंबले होते. याद्याच नसल्याने बूथ लेव्हल ऑफीसरही गायब होते.