मतदारांचा निरूत्साह उमेदवारांच्या मुळावर!
By Admin | Updated: October 17, 2014 22:52 IST2014-10-17T22:52:42+5:302014-10-17T22:52:42+5:30
गेल्या 5 वर्षात नव्या 74 हजार मतदारांची नोंद होऊनही प्रत्यक्ष मतदान प्रकियेत मात्र 4क् ते 5क् दरम्यानच मतदानाच्या टककेवारीचा आकडा दिसतो.

मतदारांचा निरूत्साह उमेदवारांच्या मुळावर!
कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेता गेल्या 5 वर्षात नव्या 74 हजार मतदारांची नोंद होऊनही प्रत्यक्ष मतदान प्रकियेत मात्र 4क् ते 5क् दरम्यानच मतदानाच्या टककेवारीचा आकडा दिसतो. परिणामी, पंचरंगी लढतीतील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख लढत विजय साळवी (शिवसेना), प्रकाश भोईर (मनसे), सचिन पोटे (काँग्रेस), संजय पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि नरेंद्र पवार (भाजपा) यांच्यातच खरी लढत आहे. 2क्क्9 च्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेता त्यावेळी एकूण 3 लाख 22 हजार 529 मतदार होते. त्यावेळी यातील केवळ 1लाख 44 हजार 894 मतदारांनी मतदानाचा हकक बजावला होता. गेल्या 5 वर्षात मतदारांचा आकडा 3 लाख 96 हजार 761 वर पोहोचला असतानाही यंदा अपेक्षेप्रमाणो मतदान झाले नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या विधानसभा निवडणुकीत 46.7क् टकके मतदान झाले होते यंदा मात्र ही टककेवारी 4क् ते 5क् टकके दरम्यानच राहीली आहे. बुधवारी मतदानाच्या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेर्पयत या मतदारसंघात 4क्.94 टकके इतकेच मतदान झाले होते. (प्रतिनिधी)
4गेल्या 5 वर्षात तब्बल 74 हजार नवीन मतदारांची नोंद होऊनही मतदानाचा टकका वाढला नसल्याने मतदारांमध्ये या निवडणुकीच्या बाबतीत निरूत्साह दिसुन आला आहे. ऑक्टोबर हिट, मतदान केंद्रांचे स्थलांतर, मतदार नावांमधील घोळ, वोटर स्लिप न मिळणो या सगळय़ामुळे मतदानात कोण बाजी मारणार? याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.