Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत उद्या २३ ठिकाणी मतमोजणी; प्रशासनाकडून तयारी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 10:28 IST

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई : महापालिकेच्या २२७ निवडणूक प्रभागांकरिता गुरुवारी मतदान, तर उद्या शुक्रवारी २३ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्याकरिता तयारी पूर्ण झाली आहे. २२७ प्रभागांकरिता २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतर्गत अभिरक्षा कक्ष (स्ट्रॉग रूम) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), पोलिसांकडून आवश्यक ती मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मध्यवर्ती निवडणूक मतमोजणी कक्ष असे...

प्रभाग १ ते ८ निवडणूक निर्णय अधिकारी शीतल देशमुख. ठिकाण : महापालिका मंडई तळघर, रूस्तमजी संकूल, दहिसर पश्चिम.

प्रभाग ९ ते १८ गीतांजली शिर्के, नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, अभिनव नगर, बोरिवली पूर्व

प्रभाग १९ ते ३१ सचिन गिरी. बजाज महापालिका शाळा, बजाज मार्ग, कांदिवली पश्चिम 

प्रभाग ३२ ते ३५ व ४६ ते ४९ विकास सूर्यवंशी. मुंबई पब्लिक स्कूल (सीबीएसई), मालवणी टाउनशीप मालाड - मार्वे रस्ता, मालाड पश्चिम

प्रभाग ३६ ते ४५ दयालसिंह ठाकूर, मुंबई पब्लिक स्कूल संकुल, कुरार गाव, मालाड पूर्व 

प्रभाग ५० ते ५८ जयराम पवार, उन्नत नगर महापालिका शाळा, गोरेगाव पश्चिम 

प्रभाग ५९ ते ७१ प्रशांत ठाकरे, शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल, अंधेरी पश्चिम

प्रभाग : ७२ ते ८१ व ८६ राजीव शिंदे. गुंदवली महापालिका शाळा, बिमानगर, अंधेरी पूर्व 

प्रभाग : ८२ ते ८५ व २७ ते १०२ प्रशांत ढगे, प्रशासकीय इमारत, एसएनडीटी विद्यापीठ, सांताक्रुझ पश्चिम 

प्रभाग : ८७ ते ९६ गजेंद्रकुमार पाटोळे. प्रभात कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा आणि साहित्य भवन इमारत, मुंबई विद्यापीठ, कलिना. 

प्रभाग : १०३ ते ११० व ११३ आणि ११४ उज्वला भगत. प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकूल, महाकवी कालिदास नाट्यगृहाच्या मागे, मुलुंड पश्चिम 

प्रभाग : १११, ११२ व ११५ ते १२२ वैशाली ठाकूर. परदेशी-सेंट झेवियर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, कांजूरमार्ग (पश्चिम) 

प्रभाग : १२३ ते १३३ बाळासाहेब खांडेकर. पंतनगर महापालिका शाळा क्र. ३, पंतनगर, घाटकोपर पूर्व 

प्रभाग : १४५ ते १५५ प्रियंका पाटील. महापालिका शिक्षण विभाग, कलेक्टर कॉलनी, आर. सी. मार्ग, चेंबूर 

प्रभाग : १३४ ते १४४ : स्नेहा उबाळे. महापालिका प्रसुतिगृह व रुग्णालय (नवीन इमारत), लल्लुभाई कंपाउंड, मानखुर्द

प्रभाग : १५६ ते १६२ व १६४ रवींद्र बोंबले. नेहरूनगर महापालिका शाळा, नेहरूनगर, केदारनाथ मंदिर मार्ग, कुर्ला पूर्व 

प्रभाग : १६३, १६५ ते १७१ रोहिणी फडतरे - आखाडे. शिवसृष्टी कुर्ला कामगार, महापालिका शाळा संकुल, नेहरूनगर, कुर्ला पूर्व 

प्रभाग : १७२ ते १८१ प्रशांत पानवेकर, नवीन महापालिका शाळा, जैन सोसायटी, वल्लभदास मार्ग, सायन पूर्व 

प्रभाग : १८२ ते १९२ अजित नैराले. डॉ. अॅन्टोनियो दा सिल्वा हायस्कूल ऍन्ड ज्युनियर कॉलेज, कबुतरखाना जवळ, दादर पश्चिम 

प्रभाग : १९३ ते १९९ वर्षाराणी भोसले. मुंबई महापालिका वरळी अभियांत्रिकी संकुल, वरळी 

प्रभाग : २०० ते २०६ अभिजीत भांडे-पाटील. पहिला मजला, पोलिस संकुल हॉल, दादर नायगाव 

प्रभाग : २१४ ते २१९ व २२० ते २२२ बाळासाहेब वाकचौरे, विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र मार्ग, गिरगाव चौपाटी 

प्रभाग : २०७ ते २१३, २२३ ते २२५ ते २२७कृष्णा जाधव. रिचर्डसन अॅन्ड कुडास कंपनी, सर जे. जे. रोड, भायखळा 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Counts Votes Tomorrow at 23 Locations; Preparations Complete

Web Summary : Mumbai's municipal elections saw voting for 227 wards. Tomorrow, counting will occur at 23 locations. The municipal administration has completed preparations, appointing 23 election officers and designating strong rooms and counting venues, all approved by relevant authorities.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६मुंबई