धुके नि गर्द रानातील वाघोबाचा धबधबा

By Admin | Updated: August 6, 2014 00:37 IST2014-08-06T00:37:38+5:302014-08-06T00:37:38+5:30

पालघर- मनोर रस्त्यावरील वाघोबाचा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे.

Voghoba waterfalls in the fog and the desert | धुके नि गर्द रानातील वाघोबाचा धबधबा

धुके नि गर्द रानातील वाघोबाचा धबधबा

हितेन नाईक ल्ल पालघर
पालघर- मनोर रस्त्यावरील वाघोबाचा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे. डोंगर कपारीतून पडणा:या पाण्याच्या धारा व गर्द हिरव्या रानातून पाऊस, धुक्याने दाटलेल्या वाघोबा खिंडीतील आनंद लुटण्यासाठी पालघरसह ठाणो, मुंबईतून अनेक कुटुंबे आपल्या बालबच्च्यांसह या भागाला भेट देत आहेत.
वाघोबा खिंड वेगवेगळ्या ऋतुत आपले वेगवेगळे दर्शन घडविते. प्रत्येक ऋतुत तिचे रुप न्यारे वाटते. चैत्रतील कोवळ्या पालवीत ती लकलकते, तर उन्हाळ्यात पळसाच्या पानाने लालसर होते. वणव्यात ती उग्र रूप धारण करते तर नंतर काळीकुट्ट बनते आणि पावसाळ्यात गर्द हिरवी होते. पालघर रेल्वे स्टेशनवरून मनोर रस्त्याकडे जाताना 5 कि.मी.वर हा धबधबा आहे. वाघोबा-भिलोबा या आदिवासींच्या जागृत देवस्थानामुळे अनेक भाविकही या भागाला भेट देत आहेत.
 
4मुंबई (चर्चगेट) पासून 9क् कि. मी. वर पालघर स्टेशन असून चर्चगेट, दादर, अंधेरी, बोरीवली, विरार वरून अनेक लोकल शटल पालघर स्टेशनवरून थांबतात. मनोरकडे जाणा:या अनेक बसेस, शेअर रिक्षा असून अवघ्या 1क् रू. मध्ये या ठिकाणावर पोहचता येते.
 
सध्या कोसळणा:या मुसळधर पावसामुळे हा धबधबा सध्या भरभरून वाहत आहे. त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पालघरसह विरार, वसई, बोरिवली, ठाणो येथून अनेक पर्यटकांची पावले या भागाकडे वळू लागली आहेत. त्यामुळे शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी या भागात मोठी गर्दी उसळते.
 
कुठल्याही प्रकारचा धोका या परिसरात नसल्याने छायाचित्रणासाठी अत्यंत विलोभनीय दृष्याची रेलचेल असल्याने पक्षीअभ्यासकांची पावलेही या भागाकडे वळू लागली आहेत.
 
79 लाखांचा निधी
4या भागाचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजनाच्या इको टुरिझमच्या निधीमधून 79 लाखांच्या निधी संयुक्त वनसमिती चहाडेच्या नावावर जमा झाल्याची माहिती राज्यमंत्री राजेंद्र गावितांनी दिली.
 
थीमपार्कची गरज
4या निधीमधून दरडी कोसळू नयेत म्हणून सुरक्षित भिंती, वाघोबा मंदिरासमोर बालोद्यान, सज्जनपाडय़ात शेलवली दरम्यानच्या दुतर्फा रस्त्यावर विविध झाडे, वाघोबा धबधब्याचा जलस्त्रोत वाढविण्यासाठी जलमृदसंधारणाची कामे करणो, निसर्ग वाटा तयार करणो, थिमपार्क तयार करणो, स्वच्छतागृहे, सौरउर्जे, पिण्याच्या पाण्याची सोय इ. कामे हाती घेतली जाणार आहेत.
 
पर्यटकांसाठी चॉईस
4पूर्वेला जव्हारच्या दाभोसा धबधबा व पश्चिमेला केळवा बिच या व्यतिरिक्त पर्यटकांसाठी वेगळा चॉईस म्हणून वाघोबा धबधबा स्थळ विकसीत होत असून गर्द हिरवे रान आणि काळ्या ढगांच्या आच्छादनात पाऊस धुक्याने दाटलेल्या वाघोबा खिंडीचा सध्या पालघरवासीयांसह बाहेरून आलेले पर्यटक मनमुराद आस्वाद घेताना दिसत आहेत.

 

Web Title: Voghoba waterfalls in the fog and the desert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.