विवेक ओबेरॉयने शहीदांच्या कुटुंबाला दिले 25 फ्लॅट

By Admin | Updated: May 13, 2017 18:08 IST2017-05-13T18:08:37+5:302017-05-13T18:08:37+5:30

समाजातील अनेक नामवंत व्यक्ती शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

Vivek Oberoi gave 25 flat to martyrs' family | विवेक ओबेरॉयने शहीदांच्या कुटुंबाला दिले 25 फ्लॅट

विवेक ओबेरॉयने शहीदांच्या कुटुंबाला दिले 25 फ्लॅट

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 13 - समाजातील अनेक नामवंत व्यक्ती शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार पाठोपाठ आता या यादीत अभिनेता विवेक ओबेरॉयचा समावेश झाला आहे.  विवेक ओबेरॉयच्या कर्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने शहीद जवानांच्या कुटुंबियांना हक्काचा निवारा दिला आहे. 
 
विवेकने केंद्रीय राखीव पोलीस दलातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना ठाण्यात मोफत 25 फ्लॅट दिले आहेत. विवेकच्या संस्थेने सीआरपीएफला लिहीलेल्या पत्रामध्ये वेगवेगळया मोहिमांमध्ये देशासाठी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना फ्लॅट देणार असल्याचे जाहीर केले आहे. 25 पैकी चार फ्लॅटच्या चाव्याही कुटुंबियांकडे सोपवल्या आहेत. 
 
अभिनेता अक्षय कुमारनेही सीआरपीएफच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना 1.08 कोटी रुपयांची मदत केली आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 11 मार्चला  भेजी गावामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबाला अक्षयने आर्थिक मदत दिली आहे. 
 
 

Web Title: Vivek Oberoi gave 25 flat to martyrs' family