Join us

आषाढी निमित्ताने 'दिव्य तेज झळकती' कार्यक्रमातून विठ्ठल भक्तीचा जागर; आशिष शेलार यांचे आयोजन

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 28, 2023 19:05 IST

संगीत संयोजन निरंजन लेले तर प्रसाद महाडकर यांचे संयोजन असेल. मिलिंद कुलकर्णी यांचे रंगतदार निवेदन असणार आहे.

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त ‘दिव्य तेज झळकती’ हा सुमधुर भक्तिमय गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार, ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

उद्या गुरुवार दि, २९ रोजी सायंकाळी ६ वाजता वांद्रे प. रंगशारदा सभागृहात विनामूल्य कार्यक्रम होईल. भक्तीगीते, अभंग यांची सांगीतिक अनुभूती घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून कार्यक्रमात सहभागी होवून वारीचा अनुभव घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

कार्यक्रमात पंडित उपेंद्र भट यांच्यासह गायक संजीव चिम्मलगी, धनश्री देशपांडे, अमृता खोडके - दहिवलेकर गायन सादर करतील. संगीत संयोजन निरंजन लेले तर प्रसाद महाडकर यांचे संयोजन असेल. मिलिंद कुलकर्णी यांचे रंगतदार निवेदन असणार आहे.

टॅग्स :मुंबईआशीष शेलार