वसईतील समुद्रकिनाऱ्यांवर वीकेण्डला पर्यटकांची गजबज
By Admin | Updated: April 6, 2015 22:50 IST2015-04-06T22:50:18+5:302015-04-06T22:50:18+5:30
मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील मुलांच्या परिक्षा नुकत्याच पार पडल्या. त्यामुळे वसईची पश्चिम किनारपट्टी हळुहळू पर्यटकांनी गजबजू लागली आहे

वसईतील समुद्रकिनाऱ्यांवर वीकेण्डला पर्यटकांची गजबज
वसई : मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील मुलांच्या परिक्षा नुकत्याच पार पडल्या. त्यामुळे वसईची पश्चिम किनारपट्टी हळुहळू पर्यटकांनी गजबजू लागली आहे. अर्नाळ्याचा निसर्गरम्य समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पर्वणी असून वन डे पिकनिकसाठी अनेक कुटुंबे आपल्या मुलाबाळांसमवेत या समुद्रकिनारी येत असतात.
अर्नाळा समुद्रकिनारी निसर्गरम्य सुरूची बाग तसेच मनोरंजनाचे कार्यक्रमाची रेलचेल असलेली तसेच खवय्यांची माफक दरात भूक शमवणारी रिसॉटर््स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. दिवसभर रिसोर्टस्मधील जलतरण तलावात मनसोक्त डुंबायचे, विविध खेळामध्ये सहभागी व्हायचे, दुपारी चवदार जेवणावर अमर्याद हात मारायचा व सायंकाळी समुद्रकिनारी घोडागाडी व उंटावरून किनाऱ्यावर फेरफटका मारायचा असा कार्यक्रम असतो. अनेक वर्षापासून हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पहिल्या पसंतीचे ठिकाण झाले आहे. दिवसभर पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी माणशी केवळ ५०० रुपयांचा खर्च होतो. मुक्कामासाठी आल्यास मात्र हा दर अडीच पटीने वाढतो. (प्रतिनिधी)