विश्वनाथ राणेंची काँग्रेसमधून हाकालपट्टी!

By Admin | Updated: August 11, 2015 23:51 IST2015-08-11T23:51:59+5:302015-08-11T23:51:59+5:30

विश्वनाथ राणे यांची पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरुन काँग्रेसमधून हाकालपट्टी करण्यात आली आहे. त्या संदर्भातील पत्र पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी केडीएमसीतील

Vishwanath Ranechi expelled from Congress! | विश्वनाथ राणेंची काँग्रेसमधून हाकालपट्टी!

विश्वनाथ राणेंची काँग्रेसमधून हाकालपट्टी!

डोंबिवली : विश्वनाथ राणे यांची पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरुन काँग्रेसमधून हाकालपट्टी करण्यात आली आहे. त्या संदर्भातील पत्र पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी केडीएमसीतील पक्षाचे गटनेते सदाशिव शेलार यांना १० आॅगस्ट रोजी पाठवले.
प्रांताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार राणेंची हाकालपट्टी करण्यात आली. त्याच पत्रात त्यांनी राणेंना कल्याण-डोंबिवली महापालिकेचे विरोधी पक्षनेते पदावरुन वगळण्यात यावे अशी माहिती शेलार यांनी महापौर, आणि आयुक्त यांना द्यावी असेही नमूद केले आहे.
‘लोकमत’मधील रवीवार-सोमवारच्या वृत्तांची दखल घेत पक्षाचे केडीएमसीतील प्रभारी अध्यक्ष, नगरसेवक सचिन पोटे यांनी मंगळवारी तात्काळ संपर्क साधला. राणेंच्या हाकालपट्टीच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांच्यावर टीका करत झोड घेतली. सोमवारच्या महासभेत पोटे म्हणाले की, सध्या या ठिकाणी अतिधोकादायक-धोकादायक इमारतींचे आॅडिट करण्याबाबत चर्चा सुरु आहे. परंतु आपल्या आजुबाजूला असलेल्या धोकादायक व्यक्तींचे आॅडीट कोण आणि कसे करणार ? असा सवाल करत ‘राणें’ना टोला लगावला.

नव्या कार्यकर्त्यांना संधी
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून कोणाच्याही जाण्यामुळे पक्षाला फरक पडणार नाही, उलट येथील तळागळात काम करणा-या कार्यकर्त्यांना संधी मिळेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
महिला आरक्षणाचा धसका घेत त्यांनी पक्ष सोडला,
त्याचा फटका पक्षाला बसला असला तरीही त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद होते, ते पक्षाचे पद नसून महापालिकेचे होते.
जसे माझ्याकडे ते पद होते तेव्हा मी वालधूनीतून उभा राहीलो, निवडून आलो. ती धमक-आत्मविश्वास त्यांच्यात नसेल म्हणूनच त्यांनी पळवाट काढत पक्ष सोडला असाच त्यातून अर्थबोध होतो.

Web Title: Vishwanath Ranechi expelled from Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.