तवा डोक्यात पडून विद्याथीर्नी जखमी
By Admin | Updated: April 1, 2017 06:38 IST2017-04-01T06:38:56+5:302017-04-01T06:38:56+5:30
शाळेत जात असताना वाटेत असलेल्या २० मजली इमारतीमधून लोखंडी तवा डोक्यावर पडल्याने

तवा डोक्यात पडून विद्याथीर्नी जखमी
मुंबई : शाळेत जात असताना वाटेत असलेल्या २० मजली इमारतीमधून लोखंडी तवा डोक्यावर पडल्याने ९ वषार्ची विद्याथीर्नी गंभीर जखमी झाक्याची घटना नागपाड्यात घडली. हाजिका कपाड़िया असे जखमी विद्याथीर्नीचे नाव असून नायर रुग्णलायाच्या अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु आहेत.
नागपाडा येथील मदनपुरा परिसरात सकाळी ११.२0 च्या सुमारास ही घटना घडली. हाजिका याच परिसरात असलेल्या शाळेत शिकते. सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना अचानक डोक्यात पडलेल्या लोखंडी तव्यामुळे ती रस्त्यावर कोसळली. स्थानिकांच्या मदतीने तिला तात्काळ नायर रुग्णालयात नेण्यात आले. सध्या तिची प्रकृति चिंताजनक आहे.
हा तवा येथीलच असलेल्या २० मजली इमारती मधून पडला आहे. अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा तवा नेमका कुणाच्या घरातून आणि कसा खाली पडला याचा शोध पोलिस घेत आहे. (प्रतिनिधी)