विष्णू सूर्या वाघ उपचारासाठी पुन्हा मुंबईत
By Admin | Updated: May 4, 2017 03:22 IST2017-05-04T03:22:21+5:302017-05-04T03:22:21+5:30
माजी आमदार विष्णू सूर्या वाघ यांना उपचारासाठी पुन्हा बुधवारी मुंबईला हलविण्यात आले आहे. मुंबईत

विष्णू सूर्या वाघ उपचारासाठी पुन्हा मुंबईत
पणजी : माजी आमदार विष्णू सूर्या वाघ यांना उपचारासाठी पुन्हा बुधवारी मुंबईला हलविण्यात आले आहे. मुंबईत त्यांना हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सात महिने मुंबईत उपचार घेतल्यानंतर एक महिन्यापूर्वी उपचाराचा एक भाग म्हणून हवापालटासाठी त्यांना गोव्यात आणण्यात आले होते.
गोव्यात असताना काही दिवसांनी अस्वस्थ वाटू लागल्याने गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. तेथून पुन्हा घरी पाठवण्यात आले होते. बुधवारी पुन्हा उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले. (प्रतिनिधी)