Join us
Daily Top 2Weekly Top 5

#VirushkaReception : स्टेजवर असताना शाहरुख असं काही म्हणाला की ऐकताच अनुष्कानं विराटला सर्वांसमोर केलं किस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:23 IST

11 डिसेंबरला इटलीमध्ये विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचा दुसरा रिसेप्शन सोहळा मुंबईत गुरुवारी (26 डिसेंबरला) मोठ्या उत्साहात पार पडला.

मुंबई - 11 डिसेंबरला इटलीमध्ये विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचा दुसरा रिसेप्शन सोहळा गुरुवारी मुंबईत(26 डिसेंबरला) मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबईतील लोअर परेलच्या सेंट रेगिस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते किंग खान शाहरुख यांच्यापर्यंत सर्व बॉलिवूडकरांनी धम्माल डान्सदेखील केला. विराट आणि अनुष्कानंदेखील पंजाबी गाण्यावर डान्स केला. मात्र एक क्षण असा आला की, जेव्हा अनुष्का शर्मानं स्टेजवरच विराट कोहलीला सर्वांसमोर किस केलं.  

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ स्टेजवर असताना शाहरुख खान विराट कोहलीच्या बाजूनं अनुष्काला 'जब तक है जान' सिनेमातील डायलॉग ऐकवत होता त्यावेळी शाहरुखनं 'जब तक है जान'ऐवजी 'जब तक है खान' असे म्हणत विराटची फिरकी घेतली, हा डायलॉग ऐकून सर्वांना हसू आले व कोहलीलादेखील सौम्य धक्का बसला. यानंतर लगेचच अनुष्कानं विराटला जवळ घेत सर्वांसमोर किस केले. विरुष्काच्या रिसेप्शनमधील हा फनी व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  दरम्यान,  या रिसेप्शन सोहळ्याला टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासह माजी क्रिकेटर संदीप पाटील, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग उपस्थित होते. तसेच जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मनीष पांडे, उमेश यादव, एम एस धोनी यांच्यासह अनेक खेळाडूंनी हजेरी लावली आहे. दुसरीकडे बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि निर्माता राजू हिरानी, विधू विनोद चोपडा, अभिनेता बोमन ईराणी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, ऐश्वर्या राय-बच्चन, माधुरी दीक्षित, कंगना राणावत, रेखा,  ए.आर. रेहमान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. 

टॅग्स :विराट अनुष्का लग्नविरूष्काविराट कोहलीअनुष्का शर्माशाहरुख खान