Join us
Daily Top 2Weekly Top 5

#VirushkaReception : विराट-अनुष्काचे मुंबईत ग्रँड रिसेप्शन, अनेक सेलिब्रिटींची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 23:59 IST

नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचा दुसरा रिसेप्शन सोहळा मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला.  मुंबईतील लोअर परेलच्या सेंट रेगिस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचा दुसरा रिसेप्शन सोहळा मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला.  मुंबईतील लोअर परेलच्या सेंट रेगिस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्यादरम्यान विराट कोहलीने जोधपुरी स्टाईलचा व्हेल्वेट सूट, तर अनुष्का शर्माने सोनेरी वेलबुट्टीचा डिझायनर लेहंगा परिधान केला होता. 

या रिसेप्शन सोहळ्याला टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे याच्यासह माजी क्रिकेटर संदीप पाटील, सुनील गावसकर, सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग उपस्थित होते. तसेच जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मनीष पांडे, उमेश यादव, एम एस धोनी यांच्यासह अनेक खेळाडूंनी हजेरी लावली आहे. दुसरीकडे बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि निर्माता राजू हिरानी, विधू विनोद चोपडा, अभिनेता बोमन ईराणी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, ऐश्वर्या राय-बच्चन, माधुरी दीक्षित, कंगना राणावत, रेखा,  ए.आर. रेहमान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर त्यांनी मागच्या आठवडयात दिल्लीमध्ये विवाहाचा पहिला रिसेप्शन सोहळा पार पडला होता. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. रिसेप्शनच्या एकदिवस आधी विराट कोहली आणि अनुष्काने नरेंद्र मोदींची भेट घेऊन रिसेप्शनचे निमंत्रण दिले होते. 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :विरूष्काविरूष्का वेडिंग