कोरोना कायद्याचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:12 IST2021-01-08T04:12:34+5:302021-01-08T04:12:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दुबईवरून मुंबईत परतलेल्या एका महिलेने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी बुधवारी महापालिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा ...

Violation of the Corona Act | कोरोना कायद्याचे उल्लंघन

कोरोना कायद्याचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दुबईवरून मुंबईत परतलेल्या एका महिलेने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी बुधवारी महापालिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुबईतुन परतलेल्या महिलेचे नाव मानसी खंडेलवाल आहे. ती दुबईला गेली होती. बुधवारी ती मुंबईत परतल्यानंतर नियमानुसार तिने सात दिवस क्वॉरंटाइन होणे आवश्यक होते. त्यासाठी तिची ७ दिवसांसाठी द ललित हॉटेलमध्ये सोय करण्यात आली होती. मात्र तिने स्वतःला क्वॉरंटाइन न करता तिच्या घरी निघून गेली. त्यानुसार महाराष्ट्र सरकारच्या कोविड-१९ तसेच साथीचे रोग पसरविणारा कायदा १८९७चे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहार पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी अभिनेता सोहेल खान, अरबाज खान व निर्वाण खान यांच्याविरोधातही खार पोलिसात अशाच प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Violation of the Corona Act