वाहनांच्या जळीतकांडाने वाशीत घबराट

By Admin | Updated: March 11, 2015 00:17 IST2015-03-11T00:17:06+5:302015-03-11T00:17:06+5:30

वाशीतील ई.एस.आय.एस. वसाहतीमध्ये दुसऱ्यांदा वाहने जाळल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली

Violating the vehicle burns | वाहनांच्या जळीतकांडाने वाशीत घबराट

वाहनांच्या जळीतकांडाने वाशीत घबराट

नवी मुंबई : वाशीतील ई.एस.आय.एस. वसाहतीमध्ये दुसऱ्यांदा वाहने जाळल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली असून सुडाच्या हेतूने अज्ञाताकडून हे कृत्य केले जात असल्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
ई.एस.आय.एस. वसाहतीमध्ये राहणाऱ्या वैशाली चौधरी व अजय गायकवाड यांची चार वाहने जाळण्यात आली आहेत. सोसायटी आवारात त्यांची वाहने उभी असताना सोमवारी मध्यरात्री दोन वाजता पेट्रोल ओतून अज्ञाताने ही वाहने पेटवली. यावेळी आगीमुळे वाहनांचे टायर फुटल्याचा आवाज झाल्याने काही रहिवाशांना जाग आली. यावेळी चार वाहने पेटत असल्याचे पाहताच त्यांनी पाणी ओतून ही आग विझवली. चौधरी यांच्या अ‍ॅक्टिवा (एमएच ४३ एव्ही ३४७१) स्कुटीवर पेट्रोल ओतून पेटवण्यात आली. यावेळी बाजूच्या इतर तीन वाहनांनी देखील पेट घेतला. त्यामध्ये व्हिक्टर (एमएच ०४ बीआर ८५४२), कॅलीबर (एमएच ०४ बीपी ९१०३) व रिक्षा (एमएच ४३ एसी २३३०) या वाहनांचा समावेश आहे.
यानंतर त्यांनी नवीन घेतली अ‍ॅक्टिवा देखील सोमवारी पेटवण्यात आली. त्यामुळे सूड उगवण्याच्या हेतूनेच तेथे वाहने जाळण्याच्या घटना घडत असल्याची शक्यता अजय गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्ह्णाची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Violating the vehicle burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.