विनोद घोसाळकरांना स्त्रीशक्ती घेरणार !

By Admin | Updated: September 26, 2014 21:40 IST2014-09-26T21:40:36+5:302014-09-26T21:40:36+5:30

विनोद घोसाळकरांना स्त्रीशक्ती घेरणार !

Vinod Ghosalkar will be subjected to femininity! | विनोद घोसाळकरांना स्त्रीशक्ती घेरणार !

विनोद घोसाळकरांना स्त्रीशक्ती घेरणार !

नोद घोसाळकरांना स्त्रीशक्ती घेरणार !
मुंबई: काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे विद्यमान आमदार विनोद घोसाळकर यांचे नाव महिला नगरसेविकांच्या अंतर्गत वादामुळे चर्चेत राहिले होते. या वादाला वेगळे वळण लागले असून विधानसभा निवडणुकीत ३ राजकीय पक्षांच्या नगरसेविका विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात घोसाळकर यांच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत. दहिसरमधील स्त्रीशक्तीने यंदा घोसाळकरांना घेरण्याची तयारी केल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाकडून नगरसेविका मनीषा चौधरी, काँग्रेसकडून नगरसेविका शीतल म्हात्रे, तर माजी महापौर डॉ. शुभा राऊळ या देखील निवडणुकीच्या मैदानात असतील. शुभा राऊळ यांनी अपक्ष फॉर्म भरल्यास त्या शिवसेनेच्या बंडखोर असतील. तीन महिला निवडणूक रिंगणार उतरल्याने घोसाळकरांची खरी कसोटी लागणार आहे. ही लढत रंगतदार होणार असून स्त्रीशक्ती घोसाळकरांना पराभूत करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दहिसरमधील काही भागात आगरी कोळी समाजाचे प्राबल्य आहे. ती मते म्हात्रे यांच्याकडे वळण्याची शक्यता अधिक आहे. घोसाळकरांनी बांधून ठेेवलेली संघटना, जनसंपर्क त्यांनी केलेली विकासकामे या घोसाळकरांच्या जमेच्या बाजू आहे. तरीदेखील एका पुरुष उमेदवारासमोर ३ महिला उमेदवार उभ्या ठाकल्याने ही लढत लक्ष्यवेधी ठरणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vinod Ghosalkar will be subjected to femininity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.