विलास खडसेला एक वर्ष कैद
By Admin | Updated: July 31, 2015 22:45 IST2015-07-31T22:45:28+5:302015-07-31T22:45:28+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १३ डिसेंबर २००५ ला सापळा रचून ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या तत्कालीन उप अभियंता विलास
विलास खडसेला एक वर्ष कैद
अलिबाग: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १३ डिसेंबर २००५ ला सापळा रचून ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या तत्कालीन उप अभियंता विलास खडसे यास रायगड जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी शुक्रवारी एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंंधक कायदा कलम ७ अन्वये सहा महिने साधी कैद, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अधिक साधी कैद असे या शिक्षेचे स्वरुप आहे.
विलास खडसे रायगड जि.प.मध्ये उप अभियंता पदावर कार्यरत असताना एका ठेकेदाराची चार हजार रुपयांची अनामत रक्कम परत करण्याकरिता आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याकरिता खडसे याने पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंंधक विभागाचे पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी सापळा
रचून विलास खडसे यास रंगेहाथ अटक केली होती. या प्रकरणी पहिले दोषारोप पत्र २७ फेब्रुवारी २००८ रोजी न्यायालयात दाखल करण्यात आले. त्याच्या सुनावणीच्या वेळी गुन्हा दाखल करण्याबाबतच्या सरकारच्या मंजुरीवर खडसे याने आक्षेप घेतला. परिणामी काही काळ ही सुनावणी स्थगित झाली होती.
न्यायालयाच्या आदेशान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरकारकडून सुधारित मंजुरी आणली व ८ नोव्हेंबर २०१२ रोजी पुन्हा दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. त्यावर सुनावणी होवून न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला आहे.
(प्रतिनिधी)