विक्रोळीत पोलीस जीपच्या अपघातात शिपाई जखमी

By Admin | Updated: October 22, 2014 01:59 IST2014-10-22T01:59:09+5:302014-10-22T01:59:09+5:30

विक्रोळीत पोलीस जीपला झालेल्या अपघातात एका पोलीस शिपायासह चालक जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली.

Vikhrolit police injures a soldier in a Jeep accident | विक्रोळीत पोलीस जीपच्या अपघातात शिपाई जखमी

विक्रोळीत पोलीस जीपच्या अपघातात शिपाई जखमी

मुंबई : विक्रोळीत पोलीस जीपला झालेल्या अपघातात एका पोलीस शिपायासह चालक जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. पोलीस शिपाई महेश परशुराम परब आणि चालक संतोष विठ्ठल जाधव असे जखमींंचे नाव असून जवळच्या खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.
या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास परब जाधवांसोबत विक्रोळी पोलीस ठाण्याची ३ मोबाइल मोटार कारने पेट्रोलिंगसाठी निघाले. पूर्व द्रुतगती मार्गावरून विक्रोळी स्टेशनच्या दिशेने जात असताना समोरून जात असलेल्या डंपरने अचानक ब्रेक दिल्याने पोलिसांची जीप त्यावर आदळून अपघात झाला. घटनास्थळाहून डंपर चालकानेही पळ काढला असून याची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यात जाधव यांंची प्रकृती चिंताजनक असून ते अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vikhrolit police injures a soldier in a Jeep accident