विक्रोळी, पवई, घाटकोपर, विद्याविहारमध्ये वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 06:31 IST2018-05-17T06:31:20+5:302018-05-17T06:31:20+5:30

टाटा पॉवरच्या साळसेत येथील वीजकेंद्रातील वीजवाहिनीला आग लागल्याने, बुधवारी सकाळी ९.३० वाजता पूर्व उपनगरातील विक्रोळी, पवई, घाटकोपर आणि विद्याविहार परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

Vikhroli, Powai, Ghatkopar, Vidyavihar disrupted power | विक्रोळी, पवई, घाटकोपर, विद्याविहारमध्ये वीज खंडित

विक्रोळी, पवई, घाटकोपर, विद्याविहारमध्ये वीज खंडित

मुंबई : टाटा पॉवरच्या साळसेत येथील वीजकेंद्रातील वीजवाहिनीला आग लागल्याने, बुधवारी सकाळी ९.३० वाजता पूर्व उपनगरातील विक्रोळी, पवई, घाटकोपर आणि विद्याविहार परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा पूर्ववत होण्यास सव्वाअकरा वाजले. भर उन्हाळ्यात बत्ती गुल झाल्याने उकाड्याने रहिवासी घामाघूम झाले.
टाटा पॉवरकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी वीजकेंद्रातील वीजवाहिनीला आग लागल्यामुळे, येथून वीजपुरवठा होत असलेल्या विक्रोळी, पवई, घाटकोपर, विद्याविहार येथील वीजपुरवठा खंडित झाला. अग्निशमन दलाने सकाळी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास आग नियंत्रणात आणली. त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

Web Title: Vikhroli, Powai, Ghatkopar, Vidyavihar disrupted power