Join us

मनसेच्या भिवंडी तालुकाध्यक्षपदी विकास जाधव यांची नियुक्ती

By नितीन पंडित | Updated: May 26, 2023 18:36 IST

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाधव यांना नियुक्तीपत्र दिले

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी तालुका अध्यक्ष पदी अंबाडी येथील विकास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे .मुंबई शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाधव यांना नियुक्तीपत्र दिले. विकास जाधव हे माजी पंचायत समिती सदस्य असून तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून जोरदार लढत दिली होती. त्यांच्या निवडी नंतर मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे,ठाणे व पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव,भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी,मदन पाटील, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांसह अनेकांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :राज ठाकरे