आदिवासी वाड्यांतही जोरदार प्रचार

By Admin | Updated: October 8, 2014 22:57 IST2014-10-08T22:57:33+5:302014-10-08T22:57:33+5:30

निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी प्रचारात आघाडी घेण्यासाठी सारेच प्रयत्न करताना दिसू लागले आहेत.

Vigorous publicity in the tribal castes too | आदिवासी वाड्यांतही जोरदार प्रचार

आदिवासी वाड्यांतही जोरदार प्रचार

अमोल पाटील, खालापूर
निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी प्रचारात आघाडी घेण्यासाठी सारेच प्रयत्न करताना दिसू लागले आहेत. प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा सारेजण आटापिटा करत आहेत. सेनेने ग्रामीण भागातील गावांकडून आदिवासी वाड्या-पाडे यांना टार्गेट केले असताना राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. अत्यंत रंगतदार होणाऱ्या या लढतीकडे मतदारांंचे लक्ष लागले असून उमेदवार मतदारांना वेगवेगळी आश्वासने देण्यात मग्न आहेत.
कर्जत विधानसभा निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होऊन बसली आहे. अलीकडे लोकसभा निवडणुकीत सेनेने प्रथम क्रमांकाची मते मिळविली असताना राष्ट्रवादी आणि शेकाप यांनीही सेनेच्या खालोखाल मते मिळवली होती. यावेळी आघाडी आणि युती तुटल्याने सेना, राष्ट्रवादी, भाजपा, कॉंग्रेस, मनसे, शेकाप, बसपा आणि अपक्ष असे आठ उमेदवार रिंगणात आहेत. सुरेश लाड हे विकासकामांच्या जोरावर मते मागत असताना सेनेचे उमेदवार हनुमंत पिंगळे यांनीही जिल्ह्याच्या हिताचे प्रलंबित प्रश्न उपस्थित करून मतांचा जोगवा मागायला सुरूवात केली आहे.

Web Title: Vigorous publicity in the tribal castes too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.