मतमोजणीसाठी जागता पहारा

By Admin | Updated: October 19, 2014 01:30 IST2014-10-19T01:30:15+5:302014-10-19T01:30:15+5:30

ठाणो जिल्ह्यातील 13 मतमोजणी केंद्रांसह आजूबाजूच्या परिसरात चार हजारांहून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचा:यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Vigilance Watch for Countdown | मतमोजणीसाठी जागता पहारा

मतमोजणीसाठी जागता पहारा

ठाणो - विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी ठाणो जिल्ह्यातील 13 मतमोजणी केंद्रांसह आजूबाजूच्या परिसरात चार हजारांहून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचा:यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाणो शहर, ठाणो ग्रामीण आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात राज्य राखीव दलाच्या कंपन्यांसह सीपीएमएफ आणि सीपीएम अशा 3क् कंपन्यांना पाचारण करण्यात आले आहे.
ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्तीवरही भर दिला आह़े निवडून आलेल्या उमेदवारांना मतमोजणीनंतर विजयी मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रंनी दिली.
जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघांत 238 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. मतदारराजाने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, त्याचा निकाल रविवारी लागणार आहे. 18 मतदारसंघांतील मतमोजणी केंद्रे निवडणूक आयोगाने निश्चित केली आहेत.  त्या ठिकाणी किंवा मतदारसंघांत अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनीही कंबर कसली आहे. (प्रतिनिधी)
 
च्जिल्ह्यात 18 मतदारसंघांत 238 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. मतदारराजाचा कौल कोणाला मिळणार, याविषयी उत्सुकता आहे.
च्मतमोजणी केंद्रे निवडणूक आयोगाने निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी किंवा मतदारसंघांत अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनीही कंबर कसली आहे.
 
ठाणो पोलीस आयुक्तालय : 
च्या हद्दीत 13 मतमोजणी केंद्रांसह आजूबाजूच्या परिसरात 8 पोलीस उपायुक्त, 13 सहायक पोलीस आयुक्त, 74 पोलीस निरीक्षक, 1क्1 उपनिरीक्षक, 892 पोलीस, 195 महिला कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या 13 कंपन्या तर सीएमएफच्या 13 कंपन्या असा बंदोबस्त लावला आहे. 
च्त्याव्यतिरिक्त गस्त आणि नाकाबंदीसाठी 35 पोलीस निरीक्षक, 1 हजार 5क्क् कर्मचारी तसेच फिक्स पॉइंटवर 7क् पोलीस निरीक्षक असून स्ट्रॅकिंग फोर्सच्या 19 तुकडय़ाही पहारा ठेवणार आहेत. तसेच ठाणो नियंत्रण कक्षेत 4क् क्यूआरडी तर भिवंडी आणि कल्याण नियंत्रण कक्षाकडे प्रत्येकी एक आरसीपीएफची तुकडी राखीव ठेवली आहे. 
च्कल्याणमध्ये 2क् पोलीस निरीक्षक, 4क्  उपनिरीक्षक, 2क्क् कर्मचारी, 5क् महिला पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या 3 तुकडय़ा तैनात राहणार आहे. या ठिकाणी दंगलविरोधी पथकही नेमण्यात येणार आहे.
 
ठाणो ग्रामीण पोलीस अधीक्षक : 
तीन मतमोजणी केंद्रांसह मतदारसंघात 3 अप्पर पोलीस अधीक्षक, 12 पोलीस निरीक्षक, 31 उपनिरीक्षक/सहायक पोलीस निरीक्षक, 8क्क् पोलीस आणि सीआरपीएफ आणि एसआरपीएफची प्रत्येकी एक तुकडी असा फौजफाटा तैनात केला असून त्याचबरोबर नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करणार आहे.
 
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय : 
या हद्दीत बेलापूर आणि ऐरोली या मतदारसंघांची मतमोजणी सेक्रेड हार्ट हायस्कूल, सेक्टर 4 वाशी येथे होणार असून 2 सहायक पोलीस आयुक्त, 6 पोलीस निरीक्षक, 2क् पोलीस उपनिरीक्षक, 3क्क् कर्मचारी आणि एक एसआरपीएफ आणि 1 सीपीएम (केंद्रीय राखीव पोलीस दल) असा बंदोबस्त तैनात केल्याची माहिती पोलीस सूत्रंनी दिली. 

 

Web Title: Vigilance Watch for Countdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.