विद्याविहार-भायखळा मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
By Admin | Updated: June 27, 2014 23:43 IST2014-06-27T23:43:01+5:302014-06-27T23:43:01+5:30
विद्याविहार - भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्यागतीसह हार्बरच्या सीएसटी-कुर्ला आणि वडाळा रोड - बांद्रा-अंधेरी स्थानकांदरम्यान रविवारचा मेगाब्लॉक आहे.

विद्याविहार-भायखळा मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
>ठाणो : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विद्याविहार - भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्यागतीसह हार्बरच्या सीएसटी-कुर्ला आणि वडाळा रोड - बांद्रा-अंधेरी स्थानकांदरम्यान रविवारचा मेगाब्लॉक आहे. हा ब्लॉक स. 11.15 ते दु. 3.15 वा.र्पयतच्या कालावधीत असेल. त्यामुळे मुख्य मार्गावरील सर्व लोकल ब्लॉकच्या कालावधीत अप जलद गती मार्गावरून धावतील.
जलद गती मार्गावरून लोकल धावणार असल्या तरीही त्या सर्व लोकल या कुर्ला, सायन, दादर, परेल या सर्व स्थानकांत थांबणार असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. या कालावधीत अप दिशेवर करीरोड, चिंचपोकळी स्थानकांदरम्यान लोकल उपलब्ध नसतील. त्यामुळे या स्थानकात येणा:या प्रवाशांना आहे त्याच तिकीट/पासावर भायखळा स्थानकात जाऊन डाऊन मार्गे प्रवासाची मुभा देण्यात आली असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
हार्बरच्या सीएसटी-कुर्ला डाऊन दिशेवर तर वडाळा रोड-बांद्रा येथील अप-डाऊन दिशांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत बांद्रा-अंधेरीच्या सीएसटीहून सुटणा:या व तेथे येणा:या सर्व गाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत. हार्बरमार्गे कुल्र्याला येणा:या डाऊनच्या गाडय़ा भायखळार्पयत मुख्य मार्गावरून धावतील. (प्रतिनिधी)
च् रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीच्या कामासाठी रविवारी वसईरोड- भाईंदर या स्थानकांदरम्यान अप, डाऊनच्या जलद मार्गावर पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन जंबोब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्री 11 ते पहाटे 3 अप जलद मार्गावर असेल.