मुंबई विद्यापीठ निकाल विलंबाचा फटका विद्याथ्र्याना

By Admin | Updated: June 30, 2014 01:45 IST2014-06-30T01:45:52+5:302014-06-30T01:45:52+5:30

मुंबई विद्यापीठामार्फत मार्च, एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या टीवायबीकॉम वगळता इतर परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.

Vidyathraya shocked the results of the University of Mumbai | मुंबई विद्यापीठ निकाल विलंबाचा फटका विद्याथ्र्याना

मुंबई विद्यापीठ निकाल विलंबाचा फटका विद्याथ्र्याना

>मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत मार्च, एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या टीवायबीकॉम वगळता इतर परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. यामुळे या विद्याथ्र्याना राज्यातील इतर विद्यापीठांत प्रवेश मिळणो मुश्कील झाले आहे. निकालाला होणा:या दिरंगाईचा फटका हजारो विद्याथ्र्याना बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याबाबत राज्यातील विद्यापीठांमधील एमए, एमएससी व इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही. येत्या आठवडय़ात बीए, बीएस्सीचे निकाल जाहीर करण्याचा प्रय} करीत आहे, असे प्र-कुलगुरू नरेश चंद्र यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक बिघडले. मात्र, काही पेपर वगळता निवडणुकीचा अधिक फटका परीक्षेला बसला नाही. नुकताच टीवायबीकॉमचा निकाल जाहीर झाला. मात्र बीएस्सी, बीए या शाखांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. याचा फटका मुंबई विद्यापीठातून राज्यातील इतर विद्यापीठात एमए, एमकॉम आणि एमएस्सी आदी शिक्षणास जाणा:या विद्याथ्र्याना बसणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vidyathraya shocked the results of the University of Mumbai